बेळगावमध्ये महाराष्ट्र समितीला धक्का; भाजपची सत्ता

बेळगावमध्ये महाराष्ट्र समितीला धक्का; भाजपची सत्ता

बेळगाव महापालिका निवडणुकांत भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीचा धक्कादायक पराभव करत बहुमत मिळवले आहे. भाजपला ३५, काँग्रेसला १०, अपक्ष ८, महाराष्ट्र एकीकर

१०२ वर्षाचे स्वातंत्र्य सैनिक, ‘पाकिस्तानी एजंट’ : भाजप आमदार
भाजपने नुकसान केले, पण अनपेक्षित चमत्कारही घडवले
काँग्रेसवरची टीका अज्ञान मुलक, अवास्तव व पूर्वग्रह दूषित

बेळगाव महापालिका निवडणुकांत भाजपने महाराष्ट्र एकीकरण समितीचा धक्कादायक पराभव करत बहुमत मिळवले आहे. भाजपला ३५, काँग्रेसला १०, अपक्ष ८, महाराष्ट्र एकीकरण समितीला ४ व एका ठिकाणी एमआयएमचा उमेदवार निवडून आला आहे.

भाजपच्या या अनपेक्षित विजयाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महापालिकेतील अनेक वर्षांच्या भाषिक राजकारणाला धक्का बसला आहे.

बेळगावच्या जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल दिल्यानेही बेळगाव व सीमा भागातील राजकारणात बदल होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकांत पहिल्यांदाच भाजप व काँग्रेस या पक्षांनी स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यात मराठी मतेही भाजपच्या पारड्यात पडली हे स्पष्ट आहे. मतदान केवळ ५० टक्के झाल्याचाही निकालांवर परिणाम झाला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव महापालिकेत ३२ सदस्य होते. १९८४ पासून बेळगावमध्ये मराठी विरुद्ध कन्नड अशा भाषिक वादात स्थानिक निवडणुका होत आहेत.

बेळगाव महापालिकेत महापौर निवडीच्या वेळी खासदार आणि आमदारांना मतदानाचा अधिकार असतो. सध्या बेळगावमध्ये भाजपाचे २ खासदार, २ आमदार, तर काँग्रेसचे २ आमदार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0