नवी दिल्लीः मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी १० च्या सुमारास दहशतवाद्यांनी पेरलेल्या बॉम्बस्फोटात ४६ आसाम रायफल बटालियनचे प्रमुख कर्नल वि
नवी दिल्लीः मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी १० च्या सुमारास दहशतवाद्यांनी पेरलेल्या बॉम्बस्फोटात ४६ आसाम रायफल बटालियनचे प्रमुख कर्नल विप्लव त्रिपाठी, त्यांची पत्नी, मुलगा आणि ४ जवान ठार झाले. हे सर्व जण लष्करी वाहनातून जात असताना त्यांचा ताफा बॉम्बस्फोटाद्वारे उडवण्यात आला. त्यात हे सर्व जण ठार झाले. ही घटना चुराचंदपूर जिल्ह्यातल्या सिंग्नाट सब डिव्हिजनमध्ये एस. सेखेन गावानजीक घडल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.
या दहशतवादी हल्ल्याची मणिपूरमधील एकाही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. पण गेल्या काही महिन्यात दहशतवादी हल्ल्यांत नागरिक ठार झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
दरम्यान या घटनेचा तीव्र शब्दांत मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी निषेध केला आहे. या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट करून या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व त्यांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. या सर्वांचे हौतात्म्य देश विसरणार नाही, आपण मृत जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
मूळ बातमी
COMMENTS