आसाममध्ये मतघोटाळा : मतदार ९० प्रत्यक्षात मते १८१

आसाममध्ये मतघोटाळा : मतदार ९० प्रत्यक्षात मते १८१

गुवाहाटीः आसाममध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या दुसर्या टप्प्यात मोठा मतघोटाळा आढळला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. राज्यातील दिमा ह

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर ईशान्य भारत अस्वस्थच
महागाईवर बोलणारे ‘शंकर-पार्वती’ही आसाम पोलिसांना खुपले
एनआरसीवरून सर्व पक्ष असमाधानी

गुवाहाटीः आसाममध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या दुसर्या टप्प्यात मोठा मतघोटाळा आढळला. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील दिमा हसाओ जिल्ह्यातील एका मतदानकेंद्रावर ९० मतदारांची नोंद असताना तेथे प्रत्यक्षात १८१ मते टाकण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. निवडणूक आयोगाने हा मतघोटाळा लक्षात आल्यानंतर ६ पोलिंग अधिकार्यांना निलंबित केले आहे. हे मतदान केंद्र हाफलांग विधानसभा मतदारसंघात येते. तेथे १ एप्रिलला मतदान झाले होते.

२०१६च्या विधानसभा निवडणुकांत येथे भाजपचे उमेदवार बीरभद्र हगजेर यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी या मतदारसंघात ७४ टक्के मतदान झाले होते.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले की, मुख्य मतदान केंद्रातील नोंद असलेल्या मतदारांनाही सहाय्यक मतदान केंद्रात मतदान करण्यास परवानगी दिल्याने ही घटना घडल्याचे प्रिसायडिंग व फर्स्ट पोलिंग ऑफिसरने जबाव दिला आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तात या प्रकरणी सेक्शन ऑफिसर सेईखोसिएम हानगुम, प्रिसायडिंग ऑफिसर प्रहलाद रॉय, पोलिंग ऑफिसर परामेश्वर चारांगसा, सेकंड पोलिंग ऑफिसर स्वराज कांती दास व थर्ड पोलिंग ऑफिसर लाजामलो तेईक यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या मतदान केंद्रात पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे.

आसाममध्ये दुसर्यांदा मतदान घेण्याची ही दुसरी घटना आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: