एचआरआरएफ पुरस्कारांसाठी ‘द वायर’च्या पत्रकारांना नामांकन

एचआरआरएफ पुरस्कारांसाठी ‘द वायर’च्या पत्रकारांना नामांकन

‘द वायर’च्या पत्रकारांनी लिहिलेल्या लेखांचा तसेच 'द वायर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुक्त पत्रकारांच्या लेखांचा समावेश ह्युमन राइट्स अँड रिलिजिअस फ्रीडम

विजय रुपाणी यांचा राजीनामा
कोविडमुळे देशभरातील २४ कोटी ७० लाख मुलांचे नुकसान
संकट काळात भारतीय स्टार क्रिकेटर आहेत कुठे?

‘द वायर’च्या पत्रकारांनी लिहिलेल्या लेखांचा तसेच ‘द वायर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुक्त पत्रकारांच्या लेखांचा समावेश ह्युमन राइट्स अँड रिलिजिअस फ्रीडम (एचआरआरएफ) पत्रकारिता पुरस्कारांसाठी तयार करण्यात आलेल्या नामांकन याद्यांमध्ये करण्यात आला आहे. राजकीय व धार्मिक क्षेत्रांतील कडव्यांकडून धार्मिक तेढ व द्वेषपूर्ण भाषा वापरण्याबद्दल केल्या जाणाऱ्या वार्तांकनाच्या क्षेत्रात ‘द वायर’च्या पत्रकारांनी मोठी कामगिरी केली आहे.

सहा जून २०२२ रोजी पुरस्कारांच्या पाच विभागांतील नामांकने जाहीर करण्यात आली. ‘बेस्ट टेक्स्ट रिपोर्टिंग’, ‘बेस्ट फोटो स्टोरी’, ‘बेस्ट व्हिडिओ स्टोरी’, ‘एचआरआरएफ यंग जर्नालिस्ट ऑफ द इयर’ आणि ‘एचआरआरएफ बेस्ट मीडिया ऑर्गनायजेशन’ या विभागांतील नामांकने जाहीर करण्यात आली.

भारतभरातील १००हून अधिक अर्जांमधून सर्व विभागातील निवडक (शॉर्टलिस्टेड) उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. विजेत्यांची घोषणा १९ जून रोजी केली जाणार आहे.

एचआरआरएफ यंग जर्नालिस्ट ऑफ द इयर’ विभागातील नामांकनप्राप्त पत्रकार

या विभागात नामांकन प्राप्त झालेले अलिशान जाफरी मुक्त पत्रकार असून, ‘द वायर’साठी नियमितपणे लेखन करतात. भारतातील सांप्रदायिकतेवर जाफरी लिहितात आणि दिल्लीमध्ये २०२० साली झालेल्या दंगलींमधील हिंदुत्ववादी कार्यकर्ते व नेत्यांच्या भूमिकेविषयी त्यांनी सातत्याने वार्तांकन केले आहे. द्वेषाच्या ऑनलाइन प्रसारावर ते बारकाईने लक्ष ठेवून असतात आणि ‘लॅण्ड जिहाद’ व ‘रेडी जिहाद’ यांसारख्या संज्ञांकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

इस्मत अरा याही मुक्त पत्रकार आहेत आणि त्यांनी सांप्रदायिकता व द्वेषमूलक कृत्यांबद्दल ‘द वायर’मध्ये सातत्याने लेखन केले आहे. उत्तर प्रदेशातील तरुणांवर केले जाणारे ‘लव्ह जिहाद’चे आरोप व दिल्लीच्या जामिना नगरमधील मंदिरांचे अतिक्रमण यांसारख्या विषयांना त्यांनी हात घातला आहे.

‘द वायर’मध्ये ऑडियन्स एंगेजमेंट एडिटर म्हणून काम करणाऱ्या नाओमी क्लारेट बार्टन यांनाही सत्ताधारी पक्षातील नेत्यांची धृवीकरणाला प्रोत्साहन देणारी भाषणे व द्वेषातून घडणारे गुन्हा यांसारख्या विषयावर लेखन केले आहे.

‘द क्विंट’मधील पत्रकार फातिमा खान यांनाही राजस्थानातील आदिवासी समुदाय व हिंदुत्ववादी संस्था यांच्यातील संघर्षाच्या वार्तांकनासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. ‘स्क्रोल.इन’मध्ये काम करणाऱ्या ऐश्वर्या एस. अय्यर यांनाही भारतातील बालसंरक्षण यंत्रणेवर हिंदुत्ववाद्यांनी ताबा कसा मिळवला हे मांडणाऱ्या लेखामुळे नामांकन प्राप्त झाले आहे.

‘बेस्ट टेक्स्ट रिपोर्टिंग’ विभागात ‘द वायर’चे कौशिक राज यांना काश्मीर फाइल्स चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान दिल्या जाणाऱ्या मुस्लिमविरोधी घोषणांबद्दलच्या वार्तांकनाबद्दल नामांकन मिळाले आहे. जामिया मिलिया इस्लामियामध्ये सीएएविरोधातील मोर्चावर गोळीबार करणाऱ्या टीनएजर विद्यार्थ्याबद्दलची बातमीही त्यांनी दिली होती. कौशिक यांनी बरेच वृत्तांत अलिशान जाफरी यांच्या सहयोगाने केले आहेत.

‘बेस्ट व्हिडिओ स्टोरी’ विभागात ‘द वायर’चे शेहलात मकनून वानी यांना नामांकन मिळाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0