‘आरे वाचले’; मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे होणार

‘आरे वाचले’; मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे होणार

मुंबईः आरे येथे उभा राहणारा मेट्रो कार शेड प्रकल्प अखेर कांजूरमार्ग येथे हलवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी घेतला. या न

‘आवश्यक सर्व झाडे कापली’
मुंबईत मधोमध विस्तीर्ण जंगलाचा निर्णय
#SaveAareyforest संतप्त झाला सोशल मीडिया

मुंबईः आरे येथे उभा राहणारा मेट्रो कार शेड प्रकल्प अखेर कांजूरमार्ग येथे हलवण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी घेतला. या निर्णयाबरोबरच आरे आंदोलनात जे नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते सामील झाले होते व ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, अशा सर्वांवरचे गुन्हे राज्य सरकारने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘आरे वाचले’ अशी प्रतिक्रिया ट्विट करून दिली.

२०१९मध्ये सप्टेंबर महिन्यात बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मेट्रो कार शेडसाठी प्रस्तावित केलेल्या आरे कॉलनीतील २,६४६ झाडांची कत्तल केली होती. एका रात्रीत तत्कालिन फडणवीस सरकारने मोठा पोलिस फौजफाटा लावून शेकडो वृक्षांची कत्तल केली होती. त्यानंतर मुंबईत जनक्षोभ उमटला होता. आरे परिसरातील व मुंबई उपनगरातील नागरिकांनी, पर्यावरण बचाव संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले होते. तरीही सरकारने आंदोलकांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत वृक्षांची कत्तल सुरू केली होती. अखेर प्रस्तावित जागेवरील सर्व वृक्षांची कत्तल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जैसे थेचा आदेश दिला होता.

रविवारी उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडच कांजूरमार्ग येथे हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आरे बचाव आंदोलनाला यश आले अशी प्रतिक्रिया उमटत होती.

कांजूर मार्ग येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड सरकारी जागेतच असून त्यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही. ही जागा शून्य खर्चात सरकारला उपलब्ध झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले. आरेतील ज्या ठिकाणचे वृक्ष कापले आहेत ती जागा अन्य कामासाठी वापरण्यात येईल. आजपर्यंत आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी १०० कोटी रु. खर्च झाले आहेत. ते वाया जाणार नाहीत, असे ठाकरे यांनी सांगितले.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नजीकची आरेतील ८०० एकर जमीन पूर्वीच संरक्षित करण्यात आली होती. पण फडणवीस सरकारने ६०० एकर जमिनीवर मेट्रो कारशेड उभे करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. आता महाविकास आघाडीच्या सरकारने ८०० एकर जमीन संरक्षित असल्याचे स्पष्ट करत या जमिनीवर राहणार्या आदिवासींचे हक्क संरक्षित राहतील अशी ग्वाही दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0