श्रमिकाचा १२०० किमीचा ७ महिन्यांचा पायी प्रवास

श्रमिकाचा १२०० किमीचा ७ महिन्यांचा पायी प्रवास

नवी दिल्लीः दिल्लीहून पायी निघालेले ५४ वर्षांचे झारखंडमधील स्थलांतरित श्रमिक बेरजोम बामडा पहाडिया गेल्या १३ मार्चला ७ महिन्यानंतर झारखंडमधील आपल्या घर

कृषीकायदे खरेच शेतकऱ्यांपुरते मर्यादित आहेत?
शेतकरी आत्महत्या, पत्रात पंतप्रधान मोदींवर आरोप
स्वारगेट ते कात्रज भुयारी मेट्रो प्रकल्पास मान्यता

नवी दिल्लीः दिल्लीहून पायी निघालेले ५४ वर्षांचे झारखंडमधील स्थलांतरित श्रमिक बेरजोम बामडा पहाडिया गेल्या १३ मार्चला ७ महिन्यानंतर झारखंडमधील आपल्या घरी पोहचले. टेलिग्राफने पहाडिया यांच्या या प्रवासाची माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पहाडिया यांनी दिल्लीहून आपला प्रवास सुरू केला होता. खिशात एकही पैसा नव्हता. त्यांच्या जवळचे पैसे कंत्राटदाराने काढून घेतले. त्यांना त्यांच्या कामाचे पैसेही दिले नाही शिवाय कामाच्या ठिकाणाहून पहाडिया यांची हकालपट्टी केली गेली होती. स्वतःजवळचे सर्व पैसे संपल्यानंतर व लॉकडाऊन पुकारल्याने रोजगारही मिळेनासा झाल्यानंतर पहाडिया यांनी आपल्या झारखंडमधील गावी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. सुमारे १२०० किमीचा प्रवास त्यांना करावा लागला.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात मोदी सरकारने अचानक कोरोना महासाथ रोखण्याची घोषणा करत लॉकडाऊन पुकारला. त्या अगोदर २०-२५ दिवसांपूर्वी पहाडिया दिल्लीत रोजगारासाठी आले होते. दिल्लीत येताना त्यांच्या गाठीला बचतीचे ७ हजार रु. व आधार कार्ड होते. पण लॉकडाऊन पुकारल्यानंतर त्यांचा रोजगार गेला, कंत्राटदाराने त्यांचे पैसे काढून घेतले. जगण्याला पैसे नसल्याने व राहायला जागा नसल्याने पहाडिया यांना फुटपाथावर झोपावे लागले. त्यांना केवळ संथाळी भाषा येत असल्याने अनेक प्रश्न उभे राहिले. घरी जाण्यासाठी काहीच वाहने वा रेल्वे नसल्याने त्यांनी भीक मागून काही दिवस काढले. भीक मागत रेल्वेच्या मार्गावर चालत त्यांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. आपल्या संपूर्ण प्रवासात त्यांना भीक मागावी लागली. अनेक रात्री त्यांना उपाशीपोटी झोपावे लागले.

गेल्या महिन्यात ११ मार्चला धनबाद जिल्ह्यातील मुच्छरायधी रेल्वे क्रॉसिंगवर उपाशी राहिलेले पहाडिया, रोटी बँक या एनजीओच्या कार्यकर्त्यांना आढळून आले. या एनजीओने त्यांची सर्व कहाणी ऐकून त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. रोटी बँकने त्यांना केवळ त्यांच्या गावानजीक असलेल्या साहेबगंज रेल्वे स्थानकापर्यंतचे तिकीट काढून दिले नाही तर त्यांना नवे कपडे दिले, पैसे दिले व अन्नपदार्थ दिले. काही दिवस त्यांना एक खोलीही राहायला दिली. त्यानंतर रोटी बँकचा एक स्वयंसेवक पहाडिया यांच्या सोबत त्यांच्या घरापर्यंत गेला व त्यांना घरच्यांकडे सुखरूप पोहचवले.

पहाडिया गावी पोहोचल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली व ज्या कंत्राटदाराने पहाडिया यांच्याकडे पैसे काढून घेतले व त्यांना नोकरीवरून काढून टाकले त्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0