मेवानी यांचा जामीन नामंजूर, ५ दिवसांची पोलिस कोठडी

मेवानी यांचा जामीन नामंजूर, ५ दिवसांची पोलिस कोठडी

नवी दिल्लीः आसाममधील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवर अटक करण्यात आलेले गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांचा जामीन अर्ज मंगळवारी आसाममधील

आसाम बोर्ड : नेहरु, मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
आसामात ‘एनआरसी’, केरळात ‘न्याय’!
रिजिजूंच्या चकमा-हाजोंग विधानावरून अरुणाचलमध्ये गदारोळ

नवी दिल्लीः आसाममधील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवर अटक करण्यात आलेले गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांचा जामीन अर्ज मंगळवारी आसाममधील बारपेटा स्थानिक न्यायालयाने फेटाळला व त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

सोमवारी पंतप्रधान मोदींविरोधात ट्विट केल्या प्रकरणी जिग्नेश मेवानी यांना आसाममधील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. पण क्रोकाझार पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचारी महिलेने मेवानी यांनी आपल्याविरोधात अपशब्द उच्चारले. मेवानींना सरळ व्यवस्थित वागण्याची समज दिली होती पण मेवानी यांनी आपल्याविरुद्ध अपशब्द उच्चारले, आपल्याकडे पाहून बोटे दाखवली, धमकी दिली व धक्का दिला असा आरोप केला होता. या आरोपावरून मेवानी यांना लगेचच आसाम पोलिसांनी अटक केली. या अटकेविरोधात मंगळवारी मेवानी यांच्या वकिलांनी बारपेटा न्यायालयात अर्ज दाखल केला असता न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला व त्यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली.

दरम्यान बारपेटा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मेवानी बुधवारी गोहाटी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मेवानी यांचे वकील अंग्शुमन बोरा यांनी द वायरला दिली.

मेवानी यांच्यावर महिला पोलिसाने सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचाही आरोप केला आहे.

गेल्या आठवड्यात बुधवारी रात्री एका ट्विट प्रकरणी आसाम पोलिसांनी जिग्नेश मेवानी यांना बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातून अटक केली होती. मेवानी यांना नंतर अहमदाबाद येथे व त्यानंतर गुरुवारी सकाळी विमानाद्वारे आसाममध्ये नेण्यात आले होते.

मेवानी यांनी १८ एप्रिलला दोन समाजात तेढ निर्माण होईल असे ट्विट केल्याची तक्रार कोकराझार येथे पोलिसांत करण्यात आली होती. हे ट्विट नथुराम गोडसे संदर्भात होते. हे ट्विट नंतर मेवानी यांनी आपल्या अकाउंटवरून हटवलेही होते. मेवानी यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ व आयपीसी कलम १५३ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.  मेवानी यांना कोकराझार पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जामीन मिळवण्यासाठी त्यांचे वकील आनंद याज्ञिक आसाम उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

मेवानी हे वडगाम मतदारसंघातील अपक्ष आमदार असून ते गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0