पुणे विद्यापीठाच्या इतिहासाच्या पेपरमध्ये चुका ?

पुणे विद्यापीठाच्या इतिहासाच्या पेपरमध्ये चुका ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या पदव्युत्तर पदवीच्या तिसऱ्या सत्राच्या पेपरमध्ये अनेक चुकीचे प्रश्न विचारल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली असून, हा पेपर विद्यापीठाच्या दर्जाला साजेसा नसल्याचीही विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. जोपर्यंत या पेपरवर निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत परीक्षेचा निकाल लावू नये, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.  

‘ब्रेक दि चेन’ : अतिरिक्त स्पष्टीकरण
प्रा. पुष्पा भावे यांचे निधन
लक्षद्वीपमध्ये दारुबंदी उठवली पण गोमांस विक्रीवर बंदी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या पदव्युत्तर पदवीच्या तिसऱ्या सत्राच्या पेपरमध्ये अनेक चुकीचे प्रश्न विचारल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली असून, हा पेपर विद्यापीठाच्या दर्जाला साजेसा नसल्याचीही विद्यार्थ्यांनी तक्रार केली आहे. जोपर्यंत या पेपरवर निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत परीक्षेचा निकाल लावू नये, अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विषयाच्या पदव्युत्तर पदवीच्या तिसऱ्या सत्राच्या पेपरमध्ये अनेक चुकीचे प्रश्न विचारल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि मानव्य विभागाचे असोसिएट डीन यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

इतिहास विषयाच्या पदव्युत्तर पदवीच्या तिसऱ्या सत्रासाठी ‘मध्ययुगीन आणि आधुनिक भारतातील शेतकऱ्यांचे उठाव’ या वैकल्पिक विषयाच्या पेपरमध्ये अनेक चुका असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या विषयाचा पेपर बहुपर्यायी (एमसीक्यु) स्वरूपाचा होता. पण त्यातील काही प्रश्नांचे पर्याय चुकीचे होते. अपेक्षित असणारे पर्यायच नव्हते. प्रश्नांचे इंग्रजीमध्ये केलेले भाषांतर अत्यंत हास्यास्पद होते. काही प्रश्न हे अभ्यासक्रमांशी संबंधीत नव्हते. तर काही प्रश्न हे विद्यापीठाच्या दर्जाला साजेसे नव्हते, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

यासंदर्भात प्रमोद बाणखेले, माधवी चंद्रकांत गुळूमकर, सरिता सुरेश जाधव, असिफ चांद शेख, मोनिका सुखदेव काटे, किरण पांडुरंग भोसले, रवींद्र भाऊसाहेब जगदाळे या विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र लिहिले असून, मानव्य विभागाचे असोसिएट डीन प्रभाकर देसाई यांनाही पत्र लिहिले आहे.

यासंदर्भात मानव्य विभागाच्या डीन अंजली कुरणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या की विद्यार्थ्यांचे पत्र मला आलेले नाहे, पण असोसिएट डीन यांना आल्याचे समजले आहे. त्या तक्रारींची सत्यासत्यता उद्या तपासून त्यावर विचार केला जाईल.

असोसिएट डीन प्रभाकर देसाई म्हणाले, की या तक्रारींची माहिती परीक्षा विभागाला दिली आहे. मी स्वतः पेपर तपासून त्यासंदर्भात संबंधीत व्यक्तींशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

अभ्यास मंडळाचे अध्यक्ष अंबाडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की याबाबत पेपर तयार करणारे संबंधीत अधिकारी आणि डीन एकत्रीतपणे निर्णय घेतील. आम्ही केवळ पेपर कोणी काढणाऱ्या गटाची निवड करतो.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकऱ यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बघतो असे सांगितले.

इतिहासाचा पेपर देणारे प्रमोद बाणखेले म्हणाले, की या अशा चुका नावलौकिक असणाऱ्या विद्यापीठाकडून होणे अपेक्षित नाही. यातील काही प्रश्न तर चुकीचे आहेत. पण काही प्रश्न हे अभ्यासक्रम पाहता दर्जाहीन आहेत. पेपर काढल्यानंतर तो दुसऱ्यांनी तपासलेला नाहे, असे लक्षात येत आहे.

बाणखेले म्हणाले, “या पेपरचा निकाल २० मेला असून, चुकीच्या प्रश्नांचा निकाल लागल्याशिवाय परीक्षेचा निकाल लावू नये.”

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0