श्रीनगर : गेल्या ५ ऑगस्टमध्ये जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर १४५ दिवसानंतर शुक्रवारी कारगील जिल्ह्यात इंटरनेट सुर
श्रीनगर : गेल्या ५ ऑगस्टमध्ये जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर १४५ दिवसानंतर शुक्रवारी कारगील जिल्ह्यात इंटरनेट सुरू करण्यात आले.
या चार महिन्यात कारगीलमध्ये कोणत्याही हिंसक घटना घडल्या नाही. येथील जनजीवन सुरळीत असून त्यामुळे इंटरनेट सेवा सुरू करण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. कारगीलमध्ये ब्रॉडबँड सेवा पहिल्यापासून सुरू आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू व काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर तेथे इंटरनेट सेवा सुरू केली जाईल असे विधान केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी काश्मीरमधून निमलष्करी दलाचे ७००० जवान माघारी बोलावण्यात आले होते. त्यानंतरचा हा निर्णय आहे.
COMMENTS