‘आयएनएक्स मीडियाची मालकी अंबानींकडे होती’

‘आयएनएक्स मीडियाची मालकी अंबानींकडे होती’

आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलेल्या आयएनएक्स मीडियाची मालकी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य व मित्रांकडे आहे, अश

अदानी आशियातील श्रीमंताच्या यादीत दुसरे
नीता अंबानींना बीएचयूमध्ये विरोध
मुंबईसह ४ विमानतळांचे उर्वरित हिस्सेही विकणार

आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलेल्या आयएनएक्स मीडियाची मालकी रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य व मित्रांकडे आहे, अशी खळबळजनक माहिती आयएनएक्स मीडिया लाच प्रकरणातील एक मुख्य आरोपी व टेलिव्हिजन एक्झिक्युटिव्ह पीटर मुखर्जी यांनी ईडीला दोन वर्षांपूर्वीच्या दिलेल्या लेखी जबाबात आहे.

७ मार्च २०१८मध्ये मुखर्जी यांनी ईडीचे असिस्टंट डायरेक्टर विवेक महेश्वरी यांना स्वतःच्या हस्ताक्षरात जबाब दिला आहे. या जबाबाची नोंद प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत नोंद करण्यात आली आहे. हा जबाब न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.

पूर्वी या प्रकरणात पीटर मुखर्जी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम व त्यांचे पुत्र व काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांचे नाव घेतले होते. त्या जबाबाच्या आधारावर पी. चिदंबरम यांना सीबीआय व ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

ईडीला सांगितलेल्या जबानीत पीटर मुखर्जी यांनी, मुकेश अंबानी यांचा आयएनएक्स मीडिया व रिलायन्सच्या निमित्ताने पी. चिदंबरम व त्यांच्या मुलाशी वारंवार चर्चा होत होती, असेही म्हटले आहे.

आता या जबानीनंतर काही मुद्दे उपस्थित होतात, त्यापैकी एक हा की मुखर्जी यांच्या ज्या सांगण्यावर चिदंबरम यांची सीबीआय, ईडीने चौकशी केली होती, तशीच चौकशी मुकेश अंबानी व अन्य व्यक्तींची का झाली नाही? त्यांना चौकशीसाठी ईडीने पत्रे का पाठवली नाहीत?

आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती चिदंबरम यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे. ही लाच अंबानी यांच्या फर्मने दिले होती असाही मुखर्जी यांच्या जबानीतून एक अर्थ घेता येतो.

महत्त्वाचा भाग म्हणजे ईडी खाते हे अर्थ खात्यातील महसूली विभागाच्या अंतर्गत येते आणि काही दिवसांपूर्वीच या खात्याच्या प्रमुखांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

२०१८मध्ये मुकेश अंबानी व त्यांच्या सहकार्यांची, कुटुंबातील सदस्यांची चौकशी का केली नाही, याबाबत ईडीचे अधिकारी मौन बाळगून आहेत.

मुखर्जी यांनी अंबानी यांच्या संदर्भात दिलेल्या जबानीची गेल्या दोन वर्षांत ईडीने साधी चौकशीही केली नाही. किंवा आयएनएक्स मीडियाचे मालक अंबानी आहेत की नाहीत, त्यांनी लाच दिली की नाही किंवा त्यांना या लाचप्रकरणाची माहिती आहे की याची चौकशी केली नाही.

ईडी व रिलायन्सची उत्तरे

द वायरने आयएनएक्स मीडियावरच्या रिलायन्सच्या मालकीसंदर्भात संबंधितांना एक प्रश्नावली पाठवली पण त्यावर रिलायन्सने कोणतेही उत्तर दिलेले नाही. ईडीचे तपास अधिकारी संदीप थापलियाल यांनी आपणाला या संदर्भात मीडियाशी बोलण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकारी देतील आता आपण या प्रकरणाच्या चौकशीतून बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले.

थापलियाल यांचे वरिष्ठ महेश गुप्ता यांनीही अंबानी यांना समन्स पाठवले होते का, या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

थेट संबंध होते का?

आपल्या जबानीत पीटर मुखर्जी म्हणाले होते की, आयएनएक्स मीडियात ते आणि त्यांची पत्नी इंद्राणी या दोघांचे १० टक्के इक्विटी होते. इंद्राणी यांच्या ‘होल्डिंग कपॅसिटी’वर मुकेश अंबानी व त्यांचे कुटुंबिय सदस्य आणि मित्र यांचे ४० टक्के, अंबानी यांचे मित्रांपैकी एनएसआर पीई या खासगी गुंतवणुकदारांचे २० टक्के इक्विटी होते. त्यामुळे आयएनएक्स मीडियातील सुमारे ६० टक्के भागीदारी अंबानी, त्यांचे कुटुंबिय व मित्रांची होती.

पीटर मुखर्जी यांनी आपल्या जबानीत असाही दावा केला होता, की मुकेश अंबानी यांचे थेट पी. चिदंबरम व कार्ती यांच्याशी थेट संबंध होते. या व्यवहारात रिलायन्समधील एल. व्ही. मर्चंट, मनोज मोदी व आनंद जैन या मुकेश अंबानी यांच्या अत्यंत निकटवर्तीयांचा सहभाग होता.

केवळ पीटर मुखर्जीच नव्हे तर इंद्राणी मुखर्जी यांनीही ५ ऑक्टोबर २०१९च्या आपल्या लेखी जबाबात मुकेश अंबानी यांचे नाव घेतले आहे. हा जबाबही असिस्टंट डायरेक्टर संदीप थापलियाल यांच्या समक्ष नोंदवून घेण्यात आला होता.

२०१३चा एसएफआयओ अहवाल

रिलायन्स व आयएनएक्स/न्यूज एक्स ग्रुप यांच्या संदर्भात सरकारी तपास यंत्रणांनी पूर्वीही आक्षेप घेतले होते.

ज्येष्ठ पत्रकार परंजॉय गुहा ठाकुरता यांनी नोव्हेंबर २०१३ रोजी The Hoot  मध्ये लिहिलेल्या लेखात मुखर्जी यांनी आयएनएक्स/न्यूज एक्स मीडिया कंपनीतील आपली भागीदारी कशी विकली आणि या कंपनीवर रिलायन्स इंडस्ट्रीने कसा ताबा घेतला यावर विस्तृत भाष्य केले आहे.

त्यांचे भाष्य सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ)ने सादर केलेल्या अहवालावर आधारित आहे. या अहवालात रिलायन्स व अंबानी यांच्या ‘असामान्य आर्थिक व्यवहारांवर’ उल्लेख आहे.

ठाकुरता यांनी २०१५मध्ये अन्य एका लेखात, प्राप्तीकर खात्याला न्यूज एक्स चॅनेलचा इंडी मीडिया को.ऑप प्राय. लिमिटेडला झालेला विक्री व्यवहार कसा संशयास्पद होता, हे आढळल्याचे म्हटले होते. एसएफआयओच्या अहवालातील २५ व्या पानात रिलायन्सने आयएनएक्स मीडिया व आयएम मीडिया प्राय. लिमिटेड ताब्यात घेण्यासाठी कसे आर्थिक व्यवहार केले यावर प्रकाश टाकला आहे.

पण या अहवालावर तत्कालिन यूपीए-२ सरकारने कोणताही तपास केला नाही.

अंबानी यांचे राजकीय कनेक्शन यापूर्वीही उघडकीस आले होते पण त्यांना कधीही चौकशीस बोलावण्यात आले नाही. अंबानी यांचे नाव ऑगस्ट वेस्टलँड प्रकरणातही आले होते. या प्रकरणातील प्रमुख आरोपी क्रिस्तियन मिशेल याने मुकेश अंबानी यांचे नाव घेतले होते.

मूळ बातमी   

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0