मुख्यमंत्र्यांसह ९ मंत्र्यांनी थकवले पाणी बिल

मुख्यमंत्र्यांसह ९ मंत्र्यांनी थकवले पाणी बिल

मुख्यमंत्र्यांसह ९ मंत्र्यांनी आणि काही केंद्रीय मंत्र्यांनी बिले थकवल्याचे उघडकीस आले आहे.

‘भाजपच्या १२१ नेत्यांची फाईल ईडीला सोपवू’
शंकराच्या पिंडीवर बसलेला विंचू
अटर्नी जनरल यांचे सत्तारूढ पक्षधार्जिणे युक्तिवाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार हिल येथील ‘वर्षा’ या निवासस्थानाचे सुमारे ७ लाख ४४ हजार ९८१ रुपयाचे पाणी बिल भरले गेले नसल्याचे आरटीआयतून निष्पन्न झाले आहे. असे पाणीबिल थकवण्यात केवळ मुख्यमंत्री नाहीत तर राज्य मंत्रिमंडळातील ९ मंत्र्यांचाही समावेश असल्याचे समजले आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेत आरटीआयतंर्गत माहिती मागवली होती. या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, पंकजा मुंडे (३५ हजार ०३३ रुपये), एकनाथ शिंदे (२ लाख २८ हजार ४२४ रुपये) , सुधीर मुनगंटीवार (१ लाख ४५ हजार ५५ रुपये), विनोद तावडे (१ लाख ६१ हजार ७१९ रुपये ), दिवाकर रावते (१ लाख ५ हजार ४८४ रुपये), चंद्रशेखर बावनकुळे (६ लाख १४ हजार ८५४ रुपये ), महादेव जानकर (१ लाख ७३ हजार ४९७ रुपये ) आणि सुभाष देसाई (२ लाख ४९ हजार २४३ रुपये) या मंत्र्यांच्या निवासस्थानाचे पाणी बिल भरलेले नाही.

या थकबाकीत ज्ञानेश्वरीचे ५९ हजार ७७८ रुपये, व सह्याद्रि अतिथिगृहाचे १२ लाख ४ हजार ३९० रुपये असल्याचे समजते.

केंद्रीय मंत्रीही सामील

गेल्या मे महिन्यात दिल्लीत राहणाऱ्या अनेक केंद्रीय मंत्र्यांनी बिले थकवल्याचे आणखी एका आरटीआयनुसार निष्पन्न झाले होते. यात विजय गोयल, प्रकाश जावडेकर, निर्मला सीतारामन, सुषमा स्वराज यांनी फेब्रुवारी महिन्यांपर्यंत बिले थकवल्याचे उघडकीस आले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0