म्यानमारमध्ये आँग सान सूकींच्या पक्षाला बहुमत

म्यानमारमध्ये आँग सान सूकींच्या पक्षाला बहुमत

यांगूनः म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुकांत आंग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी (एनएलडी) पक्षाने दुसर्यांदा बहुमत मिळवले आहे. शुक्रवारी निव

बिहार : २७९ कोटींच्या इलेक्टोरल बाँडची विक्री
कोल्हापूरमध्ये चुरशीची कुस्ती !
काश्मीर केंद्रशासित असेपर्यंत निवडणूक लढवणार नाहीः अब्दुल्ला

यांगूनः म्यानमारमध्ये सार्वत्रिक निवडणुकांत आंग सान सू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी (एनएलडी) पक्षाने दुसर्यांदा बहुमत मिळवले आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केले त्यात एनएलडीने संसदेच्या दोन्ही सभागृहांत ३४६ जागा जिंकल्या. बहुमतासाठी ३२२ हा आकडा आवश्यक होता. काही जागांचे निकाल बाकी आहेत. गेल्या ८ नोव्हेंबरला निवडणुका झाल्या होत्या.

या निवडणुकांत लष्कराचे समर्थन असलेल्या युनियन सॉलिडेरिटी अँड डेव्हलमेंट पार्टीने २५ जागा जिंकल्या तर अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करणार्या शान नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीने १५ जादा जिंकल्या. हा पक्ष अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करणारा देशातला सर्वात मोठा व प्रभावी पक्ष आहे.

दरम्यान जाहीर झालेले निकाल चुकीचे आहेत, निवडणुकांमध्ये गैरव्यवहार झाले असून हे निकाल आम्हाला मान्य नसल्याची प्रतिक्रिया यूएसडीपीने दिली आहे. निवडणुका पुन्हा घेतल्या जाव्यात अशीही मागणी त्यांनी केली आहे.

या निवडणुकांत अल्पसंख्याक मुस्लिम रोहिंग्याना मतदानापासून वंचित ठेवल्याबद्दल अनेक मानवाधिकार संघटनांनी सरकारचा निषेध केला आहे.

दरम्यान आंग सान सू की यांच्या पक्षाने निवडणुका जिंकल्याचा अर्थ त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया एनएलडीने दिले आहे. आमचे सरकार राष्ट्रीय एकता प्रस्थापित करण्यावर जोर देईल. देशातल्या ३९ अल्पसंख्याक पक्षांना सोबत येण्याचे आमंत्रण दिले आहे, असे एनएलडीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

दरम्यान आंग सान सू की यांच्या दुसर्यांदा झालेल्या विजयाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. दोन्ही देशांमधील परंपरागत मैत्रीपूर्ण संबंध अधिक मजबूत होतील व विकासाच्या दिशेने वाटचाल होईल अशी आशा असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली आहे.

मूळ बातमी  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: