नवी दिल्लीः नागालँडमधील मोन जिल्ह्यात लष्कराच्या एका तुकडीने १३ नागरिकांना दहशतवादी समजून ठार मारले. यात एक जवानही ठार झाला असून हा आकडा वाढण्याची भीत
नवी दिल्लीः नागालँडमधील मोन जिल्ह्यात लष्कराच्या एका तुकडीने १३ नागरिकांना दहशतवादी समजून ठार मारले. यात एक जवानही ठार झाला असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. केंद्र सरकारने एसआयटीमार्फत संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना दहशतवादी समजण्याची चूक नेमकी कशी झाली याचाही शोध घेतला जाईल यासाठी उच्चस्तरिय समितीमार्फत चौकशी केली जाईल असे आश्वासन नागालँडचे मुख्यमंत्री नेईफिऊ रिओ यांनी दिले आहे.
लष्करानेही चौकशीचे आदेश दिले आहेत व दोषींवर कारवाई होईल असे आश्वासन दिले आहे. झालेल्या दुर्घटनेबद्दल लष्करी सूत्रांनी खेद व्यक्त केला आहे. या संदर्भातील विस्तृत माहिती अद्याप लष्कराने दिलेली नाही.
दरम्यान लष्कराच्या या चकमकीनंतर राज्यात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
ही घटना ओटिंग व तिरु गावांत घडली. शनिवारी संध्याकाळी एका व्हॅनमधून कोळशाच्या खाणीतले काही मजूर आपले दैनंदिन काम संपवून घरी परतत असताना ते दहशतवादी असल्याचा लष्कराचा समज झाला. लष्करी सूत्रांच्या मते एनएससीएन (के) युंग आंग गटाचे काही दहशतवादी एका गाडीतून येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार लष्कराच्या एका गटाने गाडीवर गोळीबार केला यात ११ मजूर ठार झाले.
मोन जिल्हा हा म्यानमार देशाच्या लगतचा असून येथे दहशतवादी संघटना एनएससीएन (के) युंग आंग गटाचा तळ आहे.
मूळ बातमी
COMMENTS