नाशिक दुर्घटनाः मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

नाशिक दुर्घटनाः मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखाची मदत

नाशिकः शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या गळतीत मरण पावलेल्या २२ रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रु.ची आर्थिक मदत राज्य सरकार

आंतरराष्ट्रीय सेमिनारसंदर्भातील वादग्रस्त निर्णय मागे
दहशतवाद्यांसोबत अटक केलेल्या देविंदर सिंगला जामीन
‘पिगॅसस’ची व्याप्ती आणि भारत

नाशिकः शहरातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकच्या गळतीत मरण पावलेल्या २२ रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रु.ची आर्थिक मदत राज्य सरकारने मंजूर केली आहे. नाशिक महापालिकेनीही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रु.ची मदत जाहीर केली आहे.

बुधवारी ही दुर्दैवी घटना घडल्याने देशभरात शोकाकुल प्रतिक्रिया उमटत होत्या.

या रुग्णालयाची क्षमता एकूण १५० इतकी असून रुग्णसंख्या अधिक असल्याने या रुग्णालयात एकूण १५७ रुग्णांवर उपचार सुरू होतेत्यात १३१ ऑक्सिजनवर तर १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत होतेया रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १५७ रुग्णांपैकी ६३ अतिशय आजारी होतेदुपारी १२.३० सुमारास याठिकाणी गॅस गळतीची घटना घडलीत्यानंतर १.३० वाजेपर्यंत पुन्हा जोडणी करण्यात आलीया दरम्यान दुर्दैवाने यात २२ लोक मृत्युमुखी पडले असून ११ व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचा तर ११ ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा समावेश होता

घटना घडल्यानंतर तातडीने याठिकाणी ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर मागविण्यात येऊन रुग्णांवर उपचार करण्यात आले तर पाच रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहेतर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होऊन पुन्हा एकदा रुग्णांवर योग्य ते उपचार करण्यात येत आहे

राज्य शासनाकडून या घटनेचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार आहेसमितीमध्ये एक आयएएस अधिकारी एक इंजिनिअरिंग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि एक सिनियर डॉक्टरचा समावेश असणार आहे.

मन सुन्न झालेः पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत २२ रुग्णांनी आपला प्राण गमावला असून ही घटना अतिशय दुर्दैवी असून रुग्णालयात घडलेल्या प्रकारामुळे मन सुन्न झालेदुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत अशा भावना राज्याचे अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या

भुजबळ हे बुधवारी सकाळी मुंबईहून नाशिकच्या दिशेने निघालेले असताना दुपारी १२.३० च्या सुमारास नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयाच्या ऑक्सिजन टाकीमध्ये टँकरच्या माध्यमातून रिफिलिंग करत असतांना ऑक्सिजन गळतीची झाल्याची माहिती त्यांना मिळालीत्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केलीवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचे सांत्वन केले

या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख  व नाशिक महापालिका यांच्याकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्यात येईल, असे भुजबळ यांनी सांगितले. या घटनेची चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईलआपलं काम थांबणार नाहीअधिक नियोजन करून लढा सुरू राहीलया घटनेचा धडा घेऊन अधिक दक्ष राहून काम करण्याचा प्रयत्न करण्यात येईलया लढाईत नागरिकांनी जास्तीत जास्त सहकार्य करून आवश्यक ती काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान ही घटना अतिशय दुःखद व मन हेलावणारी आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी इतर रूग्णालयांच्या ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी करण्यात येऊन, तांत्रिक बाबींची पडताळणी केली जाईल, आता ऑक्सिजन गळती पूर्णत: थांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी बुधवारी सांगितले. ते संध्याकाळी घटनास्थळी पोहचले. नंतर त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली.

भुसे यांनी नंतर महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. रुग्णालयातील इतर रुग्णांना चांगले उपचार मिळतील यासाठी यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत असून आता ऑक्सिजन गळती पूर्णतः थांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0