नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अखेर अब्दुल्लांना भेटले

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते अखेर अब्दुल्लांना भेटले

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरमधील प्रमुख पक्ष नॅशनल कॉन्फरन्सच्या १५ सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळाने रविवारी पक्षाचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला व उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. शनिवारी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांना अब्दुल्ला पिता-पुत्रांची भेट घेण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार जम्मूचे प्रांतीय अध्यक्ष देवेंद्र सिंह राणा यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ भेटण्यास गेले होते.

सोमवारी पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनाही त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते भेटणार आहेत. तशी परवानगीही सरकारने दिली आहे.

जम्मू व काश्मीरमध्ये राजकीय प्रक्रिया सुरू करायची असेल तर बंदीवान केलेल्या सर्व राजकीय नेत्यांची सुटका केंद्र सरकारला करावी लागेल. अब्दुल्ला पिता-पुत्रांची प्रकृती ठीक असून राज्यातल्या घटनाक्रमांबद्दल दोघांनी चिंता व्यक्त केल्याचे देवेंद्र सिंह यांनी सांगितले.

देवेंद्र सिंह यांनी आगामी गटपंचायत  निवडणुका नॅशनल कॉन्फरन्स लढण्याचे संकेत दिले पण सर्व नेत्यांची सुटका झाल्यासच राजकीय प्रक्रियेला अर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

५ ऑगस्टला जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर येथील विविध राजकीय पक्षांच्या ५०० हून अधिक नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. त्यामध्ये अब्दुल्ला पित्रापुत्र, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, सज्जाद लोन, माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांचा समावेश आहे.

मूळ बातमी

COMMENTS