उ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे

उ. प्रदेशात दलित/महिला अत्याचाराचे सर्वाधिक गुन्हे

नवी दिल्लीः हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उ. प्रदेशातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या जानेवारीत नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) प्र

गुन्हे असलेल्या नेत्यांची माहिती सार्वजनिक करा : सर्वोच्च न्यायालय
‘अवास्तव माहितीमुळे झुंडबळीचे आकडे नाहीत’
उन्नावचा तपास ७ दिवसात हवा : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

नवी दिल्लीः हाथरस बलात्कार प्रकरणानंतर उ. प्रदेशातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. गेल्या जानेवारीत नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोने (एनसीआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात उत्तर प्रदेश हे राज्य स्त्रियांसाठी सर्वांत असुरक्षित आहे. या राज्यात २०१९ या एका वर्षात महिला व दलितांवर झालेल्या अत्याचारांच्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ेशात २०१९मध्ये महिला अत्याचाराच्या एकूण ४,०५,८६१ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यापैकी ५९,८५३ गुन्हे एकट्या उ. प्रदेशातील असून देशातील एकूण आकडेवारीच्या तुलनेत ही टक्केवारी १४.७ टक्के आहे. ही टक्केवारी देशातल्या अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

२०१९ या सालात देशात अनु. जाती-जमाती विरोधात एकूण ४५,९३५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यातील ११,८२९ गुन्हे एकट्या उ. प्रदेशातील आहेत. ही आकडेवारी देशाच्या तुलनेत २५.८ टक्के इतकी आहे.

उ. प्रदेशात अनु.जाती-जमातींवर केलेल्या अत्याचाराचे ११,९२४ गुन्हे तर २०१७मध्ये ११,४४४ गुन्हे नोंद झाले होते.

त्यानंतर महिला अत्याचारांमध्ये राजस्थानचा क्रमांक लागतो. राजस्थानात ४१,५५० गुन्ह्यांची (१०.२टक्के). महाराष्ट्र ३७,१४४ (९.२ टक्के) गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

२०१८ मध्ये देशांत महिला अत्याचार गुन्ह्यांचा आकडा ३,७८,२७७ होता, त्यातील ५९,४४५ गुन्हे एकट्या उत्तर प्रदेशात घडले होते. २०१७मध्ये हा आकडा ५६,०११ इतका होता. ही आकडेवारी लक्षात येते की दरवर्षी महिलांवर अत्याचाराचे गुन्हे वाढत आहेत.

२०१९मध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक बलात्कारांची नोंद झाली. राज्यात वर्षभरात ५,४५० म्हणजे सुमारे १५ दिवसांमागे एक बलात्काराची घटना झाली आहे. स्त्रियांविरोधात झालेल्या गुन्ह्यांची संख्या हळुहळू वाढत आहे.

२०१६ मध्ये देशातला आकडा ३,२२,९२९ होता, २०१७ मध्ये ३,४२,९८९, तर २०१८ मध्ये ३,७८,२७७ होता.

एक लाख लोकसंख्येचे प्रमाण पाहता आसाममध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तर राजस्थानमध्ये अनु. जातींवर सर्वाधिक अत्याचार झाल्याची नोंद आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: