नव्या संसद इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

नव्या संसद इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन

नवी दिल्लीः वैदिक मंत्रोच्चाराच्या उद्गोषात गुरुवारी नव्या संसद भवन इमारतीचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही नवी इमारत भारताच्य

लोकांचा मूड ओळखण्यात उदारमतवादींचे अपयश
आझाद यांच्या राजीनाम्याचा भाजपला किती फायदा?
आसामः भाजपच्या जाहिरातीवरून ८ वर्तमानपत्रांविरोधात गुन्हा

नवी दिल्लीः वैदिक मंत्रोच्चाराच्या उद्गोषात गुरुवारी नव्या संसद भवन इमारतीचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही नवी इमारत भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात येणार असून सेंट्रल व्हिस्टा योजनेतंर्गत संपूर्ण संसद भवन व अन्य इमारती नव्याने बांधण्यात येणार आहे.

या नव्या वास्तूचा खर्च ९७१ कोटी रु. असून ६४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळात ही नवी वास्तू आकारास येईल.

या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अनेक खासदार व काही देशांचे राजदूत उपस्थित होते.

या नव्या वास्तूचे रचनाकार अहमदाबाद येथील एचसीपी डिझाइन अँड मॅनेजमेंट प्राय. लिमिटेड ही कंपनी असून टाटा प्रोजेक्टस लिमिटेडतर्फे ही वास्तू उभी केली जात आहे.

नव्या संसद भवनात लोकसभेत ८८८ सदस्य व राज्यसभेत ३८४ व संयुक्त अधिवेशन बोलावल्यास मुख्य सेंट्रल हॉलमध्ये १४०० सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. सध्याच्या लोकसभागृहापेक्षा हा आकार तिप्पट आहे.

ही इमारत त्रिकोणी आकाराची असून त्यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा असतील.

भूमीपूजन झाल्यानंतर आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताचे एक प्रतीक असून ते २१ व्या शतकातील भारतीयांच्या आकांक्षा पुर्या करेल असा विश्वास व्यक्त केला. जुने संसद भवन स्वातंत्र्योत्तर भारताला दिशा देणार होते तर हे नवे संसद भवन २१ व्या शतकातील भारताच्या आकांक्षाचे प्रतीक असेल. येणार्या असंख्य पिढ्यांना हे भवन पाहून अभिमान वाटेल, असे ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0