नवी दिल्लीः चालू आर्थिक वर्षांत देशाच्या जीडीपीमध्ये ९.५ टक्के घट येऊ शकते, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी वर्तवला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समित
नवी दिल्लीः चालू आर्थिक वर्षांत देशाच्या जीडीपीमध्ये ९.५ टक्के घट येऊ शकते, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी वर्तवला. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवस बैठक सुरू होती, त्यानंतर शुक्रवारी गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारताची अर्थव्यवस्था कोरोनाचे महासंकट दूर करण्याच्या दृष्टीने शेवटच्या टप्प्यात पोहचल्याचा दावा केला.
एप्रिल ते जून या तिमाही अर्थव्यवस्थेत घसरण झाली होती, आता त्यात सुधारणा होत आहे. उत्पादन क्षेत्र व ऊर्जा क्षेत्रात तेजी येत असून २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था आपले निर्धारित लक्ष्य गाठू शकेल व महागाई खाली येईल, असा विश्वास दास यांनी व्यक्त केला.
कृषी, ग्राहक वस्तू, वीज व औषध ही क्षेत्रे वेगाने पुनर्वत होऊ शकतील. कोरोनाचा महासाथीचा प्रभाव देशाच्या पायाभूत संसाधनांवर पडला आहे. पर्यटन विकासावर अजूनही त्याचा प्रभाव आहे. पण समोर असलेली आव्हाने परतवण्यासाठी असणारा आत्मविश्वास आपल्या अर्थव्यवस्थेत आहे आणि या महासाथीत आर्थिक वृद्धीच्या दिशेने आपण जाऊ, असेही त्यांनी सांगितले.
गुरुवारी जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षांत भारताच्या आर्थिक विकास दरात ९.६ टक्के घसरण होईल तर दक्षिण आशिया क्षेत्रांमध्ये ७.७ टक्के घसरण होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. जागतिक बँकेने भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती अत्यंत खराब असल्याचेही म्हटले होते.
मूळ बातमी
COMMENTS