बंदरातील आयात माल सोडवाः गडकरींची विनंती

बंदरातील आयात माल सोडवाः गडकरींची विनंती

नवी दिल्लीः बाहेरच्या देशातून भारतीय बंदरात आलेला माल अडकून पडला असून तो त्वरित सोडवण्याची विनंती केंद्रीय जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्री

सरसंघचालकांनी मान्य केली चीनची घुसखोरी
दक्षिण चीन सागरात संघर्षाच्या ठिणग्या
तैवानच्या समुद्र हद्दीत चीनची लष्कराची प्रात्यक्षिके

नवी दिल्लीः बाहेरच्या देशातून भारतीय बंदरात आलेला माल अडकून पडला असून तो त्वरित सोडवण्याची विनंती केंद्रीय जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल यांना केली आहे. भारताच्या अनेक बंदरात माल अगोदर आलेला असून त्या मालाची बिलेही भारतीय कंपन्यांनी चुकती केली आहेत, असे गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

गडकरी यांनी पत्रात कोणत्याही देशाचे नाव घेतलेले नाही पण भारतात आलेला व पडून असलेला बहुसंख्य माल हा चीनकडून आलेला आहे. हा माल कस्टम क्लिअरन्सच्या नावाखाली अडवण्यात आला आहे.

गडकरी यांचे अशा पद्धतीचे विनंतीपत्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत  घोषणेच्या विपरित आहे. त्यात चीन-भारत तणावानंतर अनेक चिनी कंपन्यांच्या आयात वस्तूवर सरकारने नियंत्रणे आणली आहेत. रविवारी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी, जनतेने चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकल्याबद्दल कौतुक केले होते.

गडकरी यांनी पत्रात चीनवरच्या आयातीवर बंदी घालण्याबाबत किंवा आयात कर वाढवण्यावर भविष्यात सरकारने विचार जरूर करावा पण या घडीला भारतीय बंदरात अडकलेला माल सोडवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. देशातल्या मोठ्या प्रमाणावरच्या उद्योगजगताचे पैसे या आयात वस्तूंमध्ये अडकले आहेत, ते लवकर मिळाले नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर नुकसान या उद्योगांना, व्यावसायिकांना सोसावे लागेल, असेही गडकरी यांचे म्हणणे आहे.

ब्लूमबर्गक्विंटने दिलेल्या वृत्तानुसार अशी आयात थांबवल्याने व माल अडकवल्याने चीनपेक्षा भारताला त्याचा आर्थिक फटका बसू शकतो, असे गडकरींनी म्हटले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0