रजनीकांत यांचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय

रजनीकांत यांचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय

चेन्नईः तामिळ चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला ‘रजनी मक्कल मंद्राम’ हा राजकीय पक्ष लवकरच बरखास्त करणार असल्याची घोषणा सोमवारी केली. आम्हाला ज

आकड्या पलिकडचा विजय !
‘तुकडे तुकडे गँग कोण आहे?’
खेळ प्रतिमाभंजनाचा!

चेन्नईः तामिळ चित्रपटातील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला ‘रजनी मक्कल मंद्राम’ हा राजकीय पक्ष लवकरच बरखास्त करणार असल्याची घोषणा सोमवारी केली. आम्हाला जे काही करायचे होते ते शक्य होताना दिसत नाही. भविष्यात राजकारणापासूनच दूर राहावे असे आपल्याला वाटत असल्याची प्रतिक्रिया रजनीकांत यांनी दिली आहे.

गेले काही दिवस रजनीकांत उपचारासाठी अमेरिकेत होते. गेल्या आठवड्यात भारतात परत आल्यानंतर सोमवारी त्यांनी पक्षकार्यकर्त्यांशी संवाद साधला. अनेक कार्यकर्त्यांनी रजनीकांत यांना पक्षाच्या कार्याबद्दल विचारणा केली. तुम्ही सक्रीय राजकारणात केव्हा पदार्पण करणार असेही सवाल उपस्थित करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांचा भडिमार झाल्यानंतर रजनीकांत यांनी आपला पक्ष बरखास्त केला जाणार असल्याची घोषणा करत अनेकांना धक्का दिला.

रजनीकांत यांच्या घोषणेनंतर त्यांच्या चित्रपट चाहत्यांनाही हा धक्का बसला. सोशल मीडियावर अनेकांनी रजनीकांत यांच्या या अनपेक्षित निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले.

अडीच वर्षांपूर्वी रजनीकांत यांनी भारतीय राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. ते २०१९ची लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची घोषणा करतील असेही बोलले जात होते. पण रजनीकांत यांनी लोकसभा निवडणुकांपासून स्वत:ला दूर ठेवले होते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांही त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे न लढवण्याचा निर्णय घेतला होता.

रजनीकांत यांच्या या भूमिकोमुळे त्यांच्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये द्रमुकसह अन्य राजकीय पक्षांची वाट धरली होती.

आता सोमवारी त्यांनी आपला राजकीय पक्षच बरखास्त करून राजकारणापासून कायमचे दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

रजनीकांत यांचा पक्ष त्यांच्या चाहत्यांनी सुरू केलेल्या रजनीकांत फॅन्स फोरमच्या अंतर्गत चालू झाला होता. आपल्या पक्षाच्या माध्यमातून सामान्य गरीब माणसाची उन्नती व्हावी, समाज कल्याण हा आपल्या राजकीय प्रवेशाचा उद्देश असल्याचे रजनीकांत यांनी म्हटले होते. रजनीकांत यांनी तामिळनाडूत प्रत्येक जिल्हानिहाय जिल्हाप्रमुख नेमले होते तसेच राज्यातही त्यांनी कार्यकारिणी बांधण्याचा प्रयत्न केला होता.

आता पक्ष बरखास्त केला तरी आपल्या चाहत्यांनी स्थापन केलेल्या फोरमच्या माध्यमातून समाजसेवा सुरूच राहील असे रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे.

१९९६मध्येच रजनीकांत यांची राजकारणात शिरण्याची इच्छा प्रकट झाली होती. त्यावेळी त्यांनी डीएमके व तमिळ मनिला काँग्रेस युतीला पाठिंबा दिला होता. पण प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याबाबत त्यांनी अनेक वर्षे चालढकल केली.

त्यानंतर मार्च २०१८मध्ये रजनीकांत यांनी आपल्या पहिल्या राजकीय भाषणात तामिळनाडूत ‘एमजीआर सत्ता’ आणण्याची भाषा केली होती.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0