हाथरसः आरोपींच्या कारागृहात भाजप खासदार पोहचले

हाथरसः आरोपींच्या कारागृहात भाजप खासदार पोहचले

नवी दिल्लीः हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केलेले चार आरोपी ज्या जिल्हा कारागृहात आहेत त्या कारागृहात सोमवारी भाजपचे खासदार राजवीर सिंह दले

मला चीड आली आहे – नसिरुद्दीन शाह
भीमा-कोरेगाववरून केंद्र आणि राज्य आमने सामने
दोष असूनही पर्याय म्हणून मतदार काँग्रेसकडेच पाहतात

नवी दिल्लीः हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केलेले चार आरोपी ज्या जिल्हा कारागृहात आहेत त्या कारागृहात सोमवारी भाजपचे खासदार राजवीर सिंह दलेर पोहचले. जेव्हा त्यांच्या या भेटीची वार्ता पसरली तेव्हा काँग्रेसने प्रचंड टीका केली. या टिकेनंतर दलेर यांनी आपणाला जेलरनी बोलावल्यामुळे तेथे गेलो होतो व त्यांच्यासोबत चहा घेतला अशी सारवासारव केली. आपण कोणत्याही आरोपीला भेटलोही नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान रविवारी भाजपचे अन्य एक नेते राजवीर सिंह पहलवान यांच्या घरी आरोपींचे समर्थन करणारा सुमारे ५०० जणांचा जमाव जमा झाला. या जमावात आरोपींचे कुटुंबियही सामील झाले होते. या बैठकीत अटक करण्यात आलेले चारही आरोपी निर्दोष असून त्यांना चूक नसताना पकडण्यात आले असा दावा करण्यात आला.

या संदर्भात राजवीर सिंह पहलवान म्हणाले, बलात्कार झालेला नाही. पीडित कुटुंबियांनी पहिल्यांदा एका व्यक्तीचे नाव घेतले. नंतर त्यात तीन जण कसे सामील झाले? मुलीचा मृत्यू गळा दाबून खून करण्यात आला व अन्य आरोप खोटे असून सीबीआयच्या तपासातून सत्य बाहेर येईल, असा आम्हाला विश्वास वाटत असल्याचे पहलवान म्हणाले.

३ ऑक्टोबरलाही पीडित कुटुंबियांच्या घरापुढे आरोपीच्या समर्थनात ५०० जण जमा झाले होते व त्यांनी निदर्शने केली.

आदित्यनाथ सरकारविरोधात आंतरराष्ट्रीय कट

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या माध्यमातून उ. प्रदेशात जातीय दंगे भडकवण्याचा आंतरराष्ट्रीय कट रचल्याचा दावा उ. प्रदेश पोलिसांनी केला आहे. या कटाच्या नावाखाली पोलिसांनी रविवारी हाथरसमधील चंदपा या पोलिस ठाण्यात अनेक अज्ञातांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. आदित्यनाथ सरकारची बदनामी सुरू आहे, असाही आरोप पोलिसांचा आहे.

हाथरसची घटना झाल्यानंतर justiceforhathrasvictim.carrd.co या वेबसाइटवरून निदर्शने कशी करावीत व पोलिसांपासून कसे संरक्षण करावे याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. पण ही वेबसाइट नंतर बंद करण्यात आली. या वेबसाइटवरून दंगल व अश्रुधुरापासून स्वतःचे संरक्षण करण्याची माहिती देण्यात आली होती. या वेबसाइटवरचा बहुतांश मजकूर अमेरिकेतील ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर्स या चळवळीशी जोडण्यात आला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0