कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन

कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन

(१९४२-२०१९)

‘96 मेट्रोमॉल’ समजावून घेताना…
माझे ‘गांधीजीं’वरील प्रयोग(!)
शामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग २

मराठी आणि इंग्रजीतील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक आणि नाटककार किरण नगरकर यांचे आज रात्री मुंबईत निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांना मेदूतील रक्तस्त्राव झाल्याने बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले.

मुंबईमध्ये १९४२ साली नगरकर यांचा जन्म झाला. त्यांनी पत्रकार, प्राध्यापक म्हणून काम केले. जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले. त्यांनी ८ कादंबऱ्या लिहिल्या. मराठीमध्ये त्यांनी लिहिलेली ‘सात सक्कं त्रेचाळीस’, अतिशय प्रसिद्ध आहे. तर इंग्रजीमध्ये त्यांची ‘ककल्ड’ ही कादंबरी नावाजली गेली. उत्तरवसाहतवादी आधुनिक पिढीचे लेखक असलेले नगरकर अस्तित्त्ववादी साहित्याचे महत्त्वाचे लेखक होते. त्यांच्या लेखनामधून समकालीन राजकारणाचा धांडोळा घेता येतो.

त्यांना साहीत्य अकादमी पुरस्कारासह, ह. ना आपटे पुरस्कार, दालमिया पुरस्कार, रॉकफेलर ग्रांट आणि म्युनिच फेलोशिप त्यांना मिळाली होती.

२०१९ मध्ये ‘अर्सोनिस्ट’ आणि २०१७ मध्ये त्यांची जसोदा या कादंबऱ्या झाल्या होत्या. त्यांची पहिली कादंबरी १९६८ साली ‘अभिरुची’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. तीच पुढे ‘सात सक्कं त्रेचाळीस ‘ या नावाने मौज प्रकाशनाने १९७४ साली प्रकाशित केली. त्यानंतर त्यांची ‘रावण आणि एडी ‘(इ.स. १९९४) ही कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. ‘गॉड्स लिटल सोल्जर’ ही इंग्रजीत प्रकाशित झालेली कादंबरी आहे. इ.स. २००१ साली ‘ककल्ड’ (प्रतिस्पर्धी) या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. ‘कबीराचे काय करायचे?’ आणि ‘बेडटाईम स्टोरी’, या नाट्यकृती त्यांनी लिहिल्या. ‘ स्प्लिट वाईड ओपन’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1