आमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल

आमच्याकडे जन्मदाखला नाही- केजरीवाल

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेने शुक्रवारी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)विरोधात प्रस्ताव मंजूर केला. या प्रस

सरकारी शाळेतील कार्यक्रमात केजरीवाल, सिसोदियांना निमंत्रण नाही
दिल्लीत सर्वांचे उपचार; केजरीवालांचा निर्णय बदलला
भाजप कार्यकर्त्यांचा केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेने शुक्रवारी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)विरोधात प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावादरम्यान आपल्या भाषणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे, माझ्या पत्नीकडे, आईवडिलांकडे जन्म दाखला नाही फक्त मुलाकडे आहे. पण माझ्या मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यांकडे जन्मदाखला नाही, विधानसभा अध्यक्षांकडे सुद्धा तो नाही, असे असताना आम्हा सर्वांना डिटेंशन कॅम्पमध्ये पाठवणार का, असा सवाल केला.

केजरीवाल यांनी एनपीआर व एनआरसीविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. या वेळी सरकारची बाजू मांडताना त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या आमदारांकडे त्यांचा जन्मदाखला आहे का, असा सवाल केला. त्यावेळी उपस्थित असलेल्या ७० आमदारांपैकी केवळ ९ आमदारांनी हात वर केला. त्यावर केजरीवाल यांनी सभागृहात ६१ आमदारांकडे स्वत:चा जन्मदाखला नाही, त्यांना डिटेंशन कॅम्पमध्ये मोदी सरकार पाठवणार का, असा प्रश्न उपस्थित केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0