एनएसओमधून गुंतवणूकदारांचा काढता पाय; पिगॅससला नवीन बुकिंग्ज नाहीत

एनएसओमधून गुंतवणूकदारांचा काढता पाय; पिगॅससला नवीन बुकिंग्ज नाहीत

नवी दिल्ली: वादग्रस्त पेगॅसस स्पायवेअर निर्माण करणाऱ्या एनएसओ समूहाच्या खासगी इक्विटीचे मूल्य बाजारात खूपच घसरणीला लागले आहे आणि कंपनीला जुलै २०२१पासू

उ. प्रदेशात धर्मांतरणास फूस देणाऱ्यांवर रासुका
‘गोदी मीडिया’ची ‘हायपोडेर्मिक नीडल थेरपी’
आम्ही कोरोना विषाणू पसरवला नाही : चीनचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली: वादग्रस्त पेगॅसस स्पायवेअर निर्माण करणाऱ्या एनएसओ समूहाच्या खासगी इक्विटीचे मूल्य बाजारात खूपच घसरणीला लागले आहे आणि कंपनीला जुलै २०२१पासून नवीन ग्राहकांकडून कोणतेही बुकिंग मिळालेले नाही.

कन्सल्टन्सी कंपनीने एका प्रकरणाच्या संदर्भात न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, नोव्हलिपिना कॅपिटल या खासगी इक्विटी कंपनीने एनएसओ समूहाला, २०१९ मध्ये, एक अब्ज डॉलर्स मोजून, खरेदी केले होते. मात्र, एनएसओच्या इक्विटीची किंमत आता खूपच कमी झाली आहे.

खासगी इक्विटी फंडावरील नियंत्रण परत मिळवण्यासाठी कन्सल्टन्सी कंपनी बर्कले रिसर्च ग्रुपने, नोव्हलपिना कॅपिटलच्या तीन सहसंस्थापकांना न्यायालयात खेचले आहे.

नोव्हलपिनाच्या तीन सहसंस्थापकांना गेल्या वर्षी गुंतवणूकदारांनी हटवले होते आणि त्यांच्या जागी बीआरजीला आणले गेले होते. एनएसओच्या समभागांना आता काहीही मूल्य उरलेले नाही असे मत फंडाचे प्रतिनिधित्व करणारी विधिविषयक फर्म प्रोसकाउरनेही व्यक्त केल्याचे फायनान्शिअल टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे. पेगॅसस हॅकिंग टूल वापरण्याच्या उद्देशाने कोणत्याही नवीन ग्राहकाने जुलै २०२०पासून बुकिंग केलेले नाही हेही कंपनीने न्यायालयात मान्य केले आहे.

पेगॅसस या स्पायवेअरचा वापर करून जगभरातील पत्रकार, नेते व नागरिकांवर पाळत ठेवली जात आहे, असा गौप्यस्फोट ‘द वायर’सह अन्य काही माध्यमसंस्थांच्या समूहाने, याच सुमारास केला होता. मात्र, या स्पायवेअरचा वापर केवळ दहशतवादी संघटना व गुन्हेगारी टोळ्यांविरोधात केला जातो, असा एनएसओचा दावा होता. यानंतर अमेरिका सरकारने एनएसओ समूहाला काळ्या यादीत टाकले होते. अॅपलनेही एनएसओ समूहावर न्यायालयात दावा ठोकला होता. व्हॉट्सअॅपनेही या इस्रायलस्थित कंपनीविरोधात खटला दाखल केला होता.

२०२१ सालाच्या अखेरीस एनएसओला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता व त्यामुळे कंपनी कर्जांची परतफेड करू शकली नाही, असे बीआरजीच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख फिनबेर ओ’कॉनर यांनी न्यायालयात सांगितले होते. मात्र, एनएसओच्या उत्पादनांना आजही जगभरातून मागणी आहे असा दावा कंपनीच्या प्रवक्त्यांनी न्यायालयात केला.

२०२२ सालच्या जानेवारी महिन्यात ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तांतात दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने इस्रायल सरकारशी झालेल्या दोन अब्ज डॉलर्सच्या संरक्षण व्यवहारांखाली पेगॅसस खरेदी केले होते. भारत सरकारने पेगॅससच्या खरेदीचे वृत्त नाकारलेले नाही. मात्र, या स्पायवेअरचा वापर करून कोणावरही बेकायदा पाळत ठेवण्यात आलेली नाही, असे सरकारचे म्हणणे आहे.

पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये राजकीय व्यूहरचनातज्ज्ञ प्रशांत किशोर, ‘द वायर’चे सहसंस्थापक सिद्धार्थ वरदराजन व एम. के. वेणू यांचा समावेश होतो. यांच्याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावरही पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात आली होती.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0