ओमर अब्दुल्लांची अखेर सुटका

ओमर अब्दुल्लांची अखेर सुटका

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मंगळवारी सुटका झाली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे

न्यू यॉर्कमध्ये कोरोनाचे मृत्यू अधिक का?
‘पिंजरा तोड’च्या २ विद्यार्थीनींना जामीन
कोरोनावरच्या औषधाचा दावाच नव्हताः पतंजली

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मंगळवारी सुटका झाली. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू व काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे राज्य घटनेतील ३७० व ३५ अ कलम रद्द केल्यानंतर सुमारे ८ महिने ओमर अब्दुल्ला तुरुंगात होते. गेल्या १० मार्च रोजी त्यांनी पन्नाशीत प्रवेश केला होता. ऑगस्टमध्ये ओमर अब्दुल्ला यांना अटक करताना त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते पण नंतर गेल्या ५ फेब्रुवारीला त्यांच्या सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

मंगळवारी सुटका झाल्यानंतर ओमर अब्दुल्ला श्रीनगर मधील आपल्या निवासस्थानी जाताना पत्रकारांशी संवाद साधला. सरकारने ताब्यात घेतलेल्या पीडीपीच्या अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तीसह सर्व राजकीय नेत्यांची व कार्यकर्त्यांनी सुटका करावी, काश्मीरमध्ये थ्री जी, फोर जी इंटरनेट सेवा पुन्हा पूर्ववत करावी असे आवाहन त्यांनी केले. आपले तुरुंगातले दिवस हे एक वेगळे जग होते असे ते म्हणाले.

कोरोना विषाणूच संसर्ग हे सर्वांवरचे संकट असून सरकारी आदेशांचे पालन सर्वांनी करावे, आपण सर्वजण जगण्यासाठी संघर्ष करत आहोत, सरकारने सर्वच राजकीय कैद्यांची सुटका करावी असे आवाहन त्यांनी केले.

ओमर अब्दुल्ला यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्या लावल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्या विरोधात अब्दुल्लांची बहिण सारा अब्दुल्ला पायलट यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण सरकारने अब्दुल्ला यांच्या सोशल मीडियावरील पोस्टचा दाखला देत ते काश्मीरमध्ये अशांतता पसरवत असल्याचा आरोप केला होता.

गेल्या १३ मार्चला ओमर अब्दुल्ला यांचे वडिल फारुख अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली होती. त्यांच्यावरही सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेही ५ ऑगस्ट २०१९ पासून नजरकैदेत होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0