ब्लू स्टार कारवाईला ३८ वर्षे पूर्ण; सुवर्णमंदिरात खलिस्तानचे नारे

ब्लू स्टार कारवाईला ३८ वर्षे पूर्ण; सुवर्णमंदिरात खलिस्तानचे नारे

अमृतसरः ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला सोमवारी ३८ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने शीखांचे पवित्र धार्मिक स्थळ सुवर्ण मंदिरात काही कट्टरवादी खलिस्तानवादी श

शिक्षण धोरणः बहुविधलैंगिकतेच्या नजरेतून
यंदाच्या दिवाळीत फटाके दणाणणार का?
मोदी ‘खंदे’ नेते, मग सरकारची कामगिरी वाईट का?

अमृतसरः ऑपरेशन ब्लू स्टार कारवाईला सोमवारी ३८ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने शीखांचे पवित्र धार्मिक स्थळ सुवर्ण मंदिरात काही कट्टरवादी खलिस्तानवादी शीख संघटना व शिरोमणी अकाली दल (अमृतसर)च्या काही कार्यकर्त्यांनी खलिस्तानच्या घोषणा दिल्या. या वेळी काही तरुणांच्या हातात खलिस्तान झिंदाबादचे फलक होते तर काही तरुणांच्या टी शर्टवर ब्लू स्टार कारवाईत मारला गेलेला कट्टर दहशतवादी जर्नेल सिंह भिंद्रनवाले याचे चित्र होते. या प्रसंगी माजी खासदार सिमरनजीत सिंह मान यांच्या नेतृत्वाखाली शिरोमणी अकाली दल (अमृतसर)चे काही कार्यकर्ते होते, ते स्वतंत्र खलिस्तान देशाच्या घोषणा देत होते. या वेळी काहींनी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या खुनाचा मुद्दा उपस्थित केला व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणीही केली,

१९८४मध्ये सुवर्ण मंदिरात तळ ठोकून बसलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने ब्लू स्टार कारवाईअंतर्गत खातमा केला होता. सोमवारी या घटनेला ३८ वर्षे पूर्ण होत असल्याने सुवर्ण मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. ३८ वर्षांपूर्वी भारतीय लष्कराच्या कारवाईत गुरु ग्रंथ साहिब या शीखाच्या पवित्र धर्माग्रंथाच्या ‘स्वरुप’वर गोळ्या लागल्या होत्या. ती चिन्हे अजून जपून ठेवण्यात आली असून सोमवारी शीखांची सर्वोच्च धार्मिक संस्था शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने हे ‘स्वरुप’ पुन्हा भाविकांपुढे आणले होते. या वेळी अकाली तख्तचे प्रमुख जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी शीख धर्माची शिकवण व या धर्माचे सिद्घांत, इतिहास युवकांपर्यंत जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी राज्यात ग्रामीण भागात चर्च व मशीद वाढत असल्याबद्दल चिंताही व्यक्त केली केली. शीख धर्मप्रसारासाठी आता प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शीखांनी स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट व आधुनिक-पारंपरिक शस्त्रास्त्रांचा सराव करणे वा ती शिकून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0