आजपासून १५ दिवस लॉकडाऊन

आजपासून १५ दिवस लॉकडाऊन

१४ एप्रिलपासून पुढचे १५ दिवस राज्यामध्ये संचारबंदी स्वरूपातील लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. याचबरोबर ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेजही मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले, की रोजी मंदावणार असली तरी रोटीची व्यवस्था केली जाणार आहे.

भारतातील लशींच्या किमतीबाबत जाणून घ्या
कोरोना मृत्यू : एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखाची मदत
कोरोना हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे महासंकट

१४ एप्रिलपासून पुढचे १५ दिवस (१ मे सकाळी ७ वाजेपर्यंत) राज्यामध्ये संचारबंदी स्वरूपातील लॉकडाऊन लागू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. याचबरोबर ५ हजार ४०० कोटी रुपयांचे पॅकेजही मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले, की रोजी मंदावणार असली तरी रोटीची व्यवस्था केली जाणार आहे.

“बराच वेळ अनेकांशी चर्चा केल्यानंतर आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जीव वाचवणे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत पुढचे १५ दिवस संचारबंदी लागू करण्यात येत आहे. आज संध्याकाळी (१४ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. पंढरपूरमध्ये पोटनिवडणुकीचे मतदान झाल्यानंतर तिथेही निर्बंध लागू होतील,” असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू राहतील. शेतीची पावसाळी कामे सुरू राहतील. बँका सुरू राहतील. पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. बांधकामे आणि इतर उद्योग यांनी आपआपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षित व्यवस्था आहे त्याच ठिकाणी सुरू ठेवावी. मात्र इतर ठिकाणची उद्योगापर्यंत वाहतूक चालणार नाही. आरोग्य सुविधा. शीतगृहे, रेस्टॉरंटमधील पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्री केवळ पार्सलसाठी सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

नोंदणीकृत ७ कोटी नागरिकांसाठी एक महिना अन्नधान्याची ३ किलो गहू, २ किलो तांदूळ अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवभोजन थाळी एक महिना मोफत देण्यात येणार आहे. ३५ लाख लोकांना १ हजार रुपयांची रक्कम आगाऊ दिली जाणार आहे. बांधकाम मंडळातील नोंदणीकृत १२ लाख कामगारांना दीड हजार रुपयांची रक्कम आगाऊ दिली जाणार आहे. या साधारण २ लाख थाळ्या असणार दररोज आहेत. नोंदणीकृत घरेलू कामगारांनाही अर्थ सहाय्य दिले जाणार असून, अधिकृत ५ लाख फेरीवाल्यांना दीड हजार रुपये दिले जाणार आहे. परवाना धारक १२ लाख रिक्षा चालकांना प्रत्येकी दीडहजार रुपये दिले जाणार आहेत. खावटी योजनेअंतर्गत १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रती कुटुंब २ हजार रुपये दिले जाणार आहेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

कोविड काळामध्ये अत्यावश्यक खरेदी आणि अर्थसहाय्य म्हणून सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना ३ हजार ३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्यापूर्वी ठाकरे यांनी आरोग्यसेवेचा आढावा घेतला.

दररोज ४० ते ५० हजार रेमडेसिव्हरची या इंजेक्शनची गरज आहे. मात्र अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर ही गरज दररोज दुप्पट होणार आहे. राज्यामध्ये कोरोनाची चाचणी करणारी ५२३ चाचणी केंद्रे सुरू आहेत. दररोज अनेक लाख टेस्ट करीत आहोत. सगळे मिळून साडेतीन लाख बेड उपलब्ध आहेत. याही सुविधा अपुऱ्या पडत आहेत. दररोज हजार ते १२ शे मेट्रिक टन दररोज ऑक्सीजन उपलब्ध होत आहे. मात्र तरीही ऑक्सीजनची कमतरता भासत आहे. रेमडेसिव्हरसारखे औषध तयार व्हायला दोन ते तीन आठवडे लागतात. पण आपण जिथून मिळेल तिथून औषधे मागवीत आहोत. इतर राज्यातून ऑक्सीजन मागविण्यासाठी केंद्राकडे परवानगी मागितली आहे. मात्र इतर राज्यांचे अंतर पाहता, पुरवठा होण्यासाठी वेळ लागत आहे. रस्त्याने ऑक्सीजन येईलच, पण लष्करी तज्ज्ञांची मदत घेऊन हवाईमार्गे ऑक्सीजन पुरवठा करण्याची पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. तसे पत्र लिहीत आहे, असे ठाकरे म्हणाले.

ठाकरे म्हणाले, “मार्च महिन्यात ‘जीएसटी’ परतावा भरण्यासाठी मुदत तीन माहिन्यांपर्यंत वाढवावी. ही नैसर्गिक आपत्ती मानून, हातावरचे पोट असणाऱ्यांना व्यक्तिगत मदत करावी, अशी विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. पंतप्रधान म्हणतात लस महोत्सव करा. लसीकरण वेगाने करणे गरजेचे आहेच. ब्रिटनने वेगाने लसीकरण केले तसेच आपल्यालाही जावे लागेल. त्यामुळेच पुढचा वेग थोपवू शकू. गेल्यावर्षी आपण कोविडला एका नियंत्रणांमध्ये ठेवले होते. मात्र यावर्षी ही लाट मोठी आहे. ही रुग्णवाढ भयावह आहे. सुविधा वाढवल्या जात आहेत. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, डॉक्टर, परिचारिका, बेड वाढवीत आहोत. मात्र याही सुविधा कमी पडत आहेत.”

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले, की हे युद्ध जिंकण्यासाठी परिचारिका, निवृत्त डॉक्टर आणि स्वयंसेवी संघटनांनी पुढे यावे. ते म्हणाले, की समाजातील अनेकजणांशी संवाद साधत आहोत. मंतमतांतरे आहेत. मात्र कोणीही उणी दुणी काढू नये. ही ती वेळ नाही. काही लपवाचपावी नाही. नाईलाज  म्हणून बंधने ताकत आहोत. जगभरचा अनुभव पाहून ही साखळी तोडण्यासाठी काही बंधने घालत आहोत.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: