उ. पाकिस्तानामुळे वाढल्या कांद्याच्या किंमती

उ. पाकिस्तानामुळे वाढल्या कांद्याच्या किंमती

उ. पाकिस्तान व अफगाणिस्तान हे मान्सूनच्या पट्‌ट्यात न येणारे प्रदेश आहेत. पण या दोन प्रदेशातील तापमान फरकाचा परिणाम भारतातल्या परतीच्या मान्सूनवर होत असतो.

कांदा निर्यातीवर केंद्र सरकारकडून बंदी
कांद्याचे संकट – सरकारकडे उपाययोजना नाहीत
कांदा निर्यातीवर बंदी, शेतकरी आक्रमक

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात देशभरात कांद्याच्या गगनाला भिडलेल्या दरामुळे कांद्याच्या चोरीच्या घटना घडताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी सुरतमध्ये एका दुकानातून २५० किलो कांद्याची चोरी झाली. या कांद्याची बाजारभाव किमत पाहता ती २५ हजार रु.च्या घरात जाते.

कांद्याच्या वाढत्या किंमती हा राजकारणातील एक महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. सत्ताधारी पक्षांना तर ही नेहमीची डोकेदुखी झाली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कांदा प्रती किलो ७० रु. झाल्याने त्यावेळी देशभर राजकीय वातावरण तापले होते.

वास्तविक मान्सून लांबल्याने व तो ९ ऑक्टोबरनंतर परतत असल्याने कांद्याच्या पीकावर त्याचा परिणाम झाला. या लांबलेल्या मान्सूनने कांद्याचे सर्वाधिक पीक घेतल्या गेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात थैमान घातले त्याने किमती वाढत गेल्या.

कांद्याचे देशात एकूण उत्पादनापैकी ३८ टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. या महाराष्ट्रावर १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत एकूण पावसाच्या सरासरी १.५ टक्के पाऊस अधिक पडला.

कर्नाटक हा देशातल्या एकूण कांदा उत्पादनापैकी १२ टक्के कांदा पिकवतो. या राज्याला ६५ टक्के अतिरिक्त पावसाचा सामना ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात करावा लागला.

या अवकाळी पावसाने कांदा पिके पाण्याखाली बुडली, वाहून गेली त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. त्यामुळे सुमारे देशाला लागणारा ५० टक्के कांदा हा नुकसानीत गेला.

महाराष्ट्र व कर्नाटकात या पिकाचे एक तृतीयांश उत्पादन वाया गेले. महाराष्ट्राच्या काही भागात या नुकसानीची टक्केवारी १०० टक्के इतकीही आहे.

त्यामुळे उत्पादनच कमी झाल्याने व मागणी अधिक असल्याने कांद्याचे दर वाढत गेले आणि हा कांदा आजच्या घडीला ५० ते ७० रुपयाच्या घरात आहे. काही ठिकाणी त्याने शंभरीही ओलांडली आहे.

मान्सून का लांबला?

मान्सून का लांबला यावर पोस्टडॅम इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञ इलना सुर्वोव्यक्तीना म्हणतात, ‘परतीच्या मान्सूनमुळे जमीन व समुद्रातील तापमानावर परिणाम झाला. भारतीय उपखंडात उन्हाळ्यात समुद्रापेक्षा जमीन लवकर तापते आणि त्यामुळे बंगालचा उपसागर व अरबी समुद्राच्या हवेत जे बाष्प तयार होते ते भारतीय उपखंडावर पसरत जाते आणि पाऊस पडतो.

जेव्हा मान्सून संपत जातो तेव्हा जमीन समुद्राच्या तुलनेत कमी तापते जाते समुद्रातील तापमान हे तसे उबदार राहते. त्याने मान्सूनचे वारे मागे ढकलले जातात. आणि पाऊस लांबत जातो.’

सुर्वोव्यक्तीना यांनी विदर्भ, उ. पाकिस्तान व अफगाणिस्तानातील तापमानाचा अभ्यास केला. त्या म्हणतात, उ. पाकिस्तान व अफगाणिस्तान हे मान्सूनच्या पट्‌ट्यात न येणारे प्रदेश आहेत. पण या दोन प्रदेशातील तापमान फरकाचा परिणाम भारतातल्या परतीच्या मान्सूनवर होत असतो. जेव्हा भारतात परतीचा मान्सून सुरू झाला तेव्हा या प्रदेशातील तापमान २७ अंश सेल्सियस होते. आणि सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात उ. पाकिस्तानातील तापमान ३१.५ अंश सेल्सियस असे वाढले. या वाढलेल्या तापमानामुळे वायव्य भारतावरील परतीचा पाऊस अनेक दिवस लांबला.

सुर्वोव्यक्तीना यांनी आपला हा अंदाज द वायरला ३० सप्टेंबर रोजी सांगितला. आणि १४ ऑक्टोबर रोजी त्यांचे अंदाज खरे ठरले. या दिवसानंतर मध्य भारतावर रेंगाळलेला मान्सून माघारी परतू लागला.

गेले तीन वर्षे भारतात परतीचा मान्सून रेंगाळताना दिसत आहे असे सुर्वोव्यक्तीना यांचे म्हणणे आहे. त्या म्हणतात साधारण १ ऑक्टोबरनंतर मध्य भारतातून मान्सून माघारी परतत असतो आणि साधारण १४ ते १८ ऑक्टोबरपर्यंत तो पूर्णपणे माघारी जातो. पण यंदा उ. पाकिस्तान व अफगाणिस्तानात तापमान वाढल्याने परतीचा मान्सून रेंगाळला.

२०१६मध्ये सर्वोव्यक्तीना यांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला होता. या शोधनिबंधात २००३ ते २०१५ या काळात परतीचा मान्सून ९ वेळा लांबल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

त्या म्हणतात, परतीच्या पावसाची तारीख आता निश्चितच बदलली आहे आणि या बदलाला कारणीभूत उ. पाकिस्तान व अफगाणिस्तानातील वाढणारे तापमान हे आहे.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0