नवी दिल्लीः आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन, स्वतःच्या मर्यादा व प्रश्नांना बाजूला ठेवून, मतभेद विसरून लढले पाहि
नवी दिल्लीः आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन, स्वतःच्या मर्यादा व प्रश्नांना बाजूला ठेवून, मतभेद विसरून लढले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी शुक्रवारी केले. काँग्रेसने १९ विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, शिवसेना, झारखंड मुक्ती आघाडी, माकप, भाकप, नॅशनल कॉन्फरन्स, राजद, एआययूडीएफ, व्हीसीके, लोकतांत्रिक जनता दल, जनता दल सेक्युलर, राष्ट्रीय लोकदल, आरएसपी, केरळ काँग्रेस मनिला, पीडीपी व आययूएमएल या पक्षांचे प्रतिनिधी होते. ही बैठक ऑनलाइन घेण्यात आली होती.
या बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, आपल्या सर्वांपुढे मर्यादा आहेत, अडचणी आहेत पण आता वेळ आली आहे की देशहितासाठी आपापसातले मतभेद मिटवून, सर्वांनी एकजूट होऊन २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यश मिळवणे महत्त्वाचे आहे. या निवडणुका एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान परतावण्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन काम केले पाहिजे. त्या एकजुटीला पर्याय नाही. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य आंदोलनातील मूल्ये व राज्य घटनेतील सिद्धांत यांच्यावर विश्वास ठेवून काम केले पाहिजे. सर्वांनी एकत्र आल्यास एक सर्वसमावेशक रणनीती तयार होईल, त्याच्यावर चर्चा होईल.
काही सूत्रांच्या मते पुढील वर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असून त्या निवडणुकांमध्येही काँग्रेस विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.
काही दिवसांपूर्वीच प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात लढले पाहिजे, अशी भूमिका व्यक्त केली होती.
मूळ बातमी
COMMENTS