मुस्लिम असल्याच्या संशयावरून वृद्धाचा कथित मारहाणीत मृत्यू

मुस्लिम असल्याच्या संशयावरून वृद्धाचा कथित मारहाणीत मृत्यू

नीमचः मध्य प्रदेशात नीमच जिल्ह्यात भाजप कार्यकर्ता दिनेश कुशवाहा याने भवरलाल जैन या मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या वृद्धाला ते मुस्लिम असल्याच्या संशय

काश्मीरचा इतिहास, भूगोलही बदलला
पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १५ प्रश्न (त्यांनी कधी उत्तर द्यायचे ठरवलेच तर!)
राज्यसभेत भाजपची शंभरी, काँग्रेसचे केवळ ३० सदस्य

नीमचः मध्य प्रदेशात नीमच जिल्ह्यात भाजप कार्यकर्ता दिनेश कुशवाहा याने भवरलाल जैन या मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या वृद्धाला ते मुस्लिम असल्याच्या संशयाने कथित मारहाण केली, यात भंवरलाल जैन यांचा मृत्यू झाला. दिनेश कुशवाहा याची पत्नी बीना मानसा माजी नगरसेवक आहे. तर दिनेश हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. सदर घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला.

दिनेश कुशवाहा हे मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या भंवरलाल जैन यांना ते मुस्लिम आहेत का अशी सतत विचारणा करत मारहाण करत असल्याचा व्हीडिओ काढण्यात आला. तुम्हारा नाम मोहम्मद है क्या? असे विचारत त्यांच्याकडून आधार कार्डही दिनेश कुशवाहा मागत होते. या कथित मारहाणीत भंवरलाल जैन यांचा मृत्यू झाला. जैन यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर या मारहाणीचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला व नेमकी घटना उघडकीस आली. या नंतर पोलिसांनी कुशवाहा याला ताब्यात घेतले. तर भंवरलाल जैन यांच्या शवाचे पोस्टमार्टम झाले असले तरी मृत्यूचे कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही.

मृत भंवरलाल जैन रतलाम जिल्ह्यातील सरसी गांवातील रहिवाशी असून ते १६ मे रोजी राजस्थानमधील चितोडगढ येथे एका धार्मिक कार्यक्रमात उपस्थित होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. जैन यांच्या कुटुंबियांनी भंवरलाल हे बेपत्ता झाल्याची फिर्याद चितोडगढ पोलिसांमध्ये दाखल केली होती. त्यानंतर १९ मे रोजी नीमच जिल्हा मुख्यालयापासून ३८ किमी अंतरावरील मानसा पोलिस ठाण्यांतर्गत रामपुरा रोड येथे भंवरलाल जैन यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.

द वायरने नीमच पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पोलिसांनी भंवरलाल जैन हे आपल्या वडिलांच्या गावी सरसी येथे जाण्याचा प्रयत्न करत होते. नीमच येथील मानसा भागातही सरसी नावाचे एक गाव असून चुकीने ते मानसा भागातल्या सरसी गावात पोहचले. तेथे ते आपल्या कुटुंबियांची चौकशी करत असताना कुशवाहा यांना भंवरलाल जैन दिसले. पण ते मानसिक दृष्ट्या आजारी असल्याने योग्य ती माहिती ते कुशवाहा यांना देऊ शकत नव्हते. जैन यांनी बोलताना चुकून मोहम्मद असा शब्द उच्चारला, त्यावरून कुशवाहा नाराज झाले व त्यांनी भंवरलाल जैन यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीचा व्हीडिओ काढण्यात आला व भंवरलाल जैन यांच्या मृत्यूनंतर तो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्याने घटना सर्वांना लक्षात आली.

दिनेश कुशवाहा याच्याकडे भाजपचे कोणतेही पद नसले तरी ते पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे नीमच जिल्ह्याचे भाजप प्रमुख पवन पाटीदार यांनी सांगितले. या घटनेनंतर कुशवाहा यांना पक्षातून निलंबित करत असल्याची घोषणा पाटीदार यांनी केली. तर राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कुशवाहा यांच्यावर खटला दाखल करून चौकशी सुरू केल्याचे सांगितले.

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह व कमलनाथ यांनी भाजपशासित राज्यात मुसमानांविरोधात सुरू असलेल्या हिंसेबद्दल तीव्र शब्दांत टीका केली. राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे का असा सवाल या दोन नेत्यांनी केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0