एमपीएससी- बीएड सीईटी परीक्षार्थींना बॅच बदलण्याचा पर्याय

एमपीएससी- बीएड सीईटी परीक्षार्थींना बॅच बदलण्याचा पर्याय

मुंबई: एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्

१५ सप्टें. ते १० ऑक्टोबर दरम्यान सीईटी
एएनएम, जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही
सीईटीची पुन्हा संधी;९ व १० ऑक्टोबरला परीक्षा

मुंबई: एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देणार येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्ववारे विधानपरिषदेत व विधानसभेत दिली.

सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचमसीटी या दोन विषयाची परीक्षा २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरीत सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटी मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0