पी. चिदंबरम यांना अखेर अटक

पी. चिदंबरम यांना अखेर अटक

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री व गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणात ‘नाट्यमय

‘आम्ही सगळे जेएनयू’ असे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे
‘क्रोनोलॉजी समझीये’ : सीबीआयच्या माजी प्रमुखांवरही पाळत
शाह फैजल यांना अटक, काश्मीरमध्ये नजरकैद

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री व गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणात ‘नाट्यमयरित्या’ सीबीआयने अटक केली.

मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना अंतरिम जामीन नाकारल्यानंतर सीबीआयने दोन तासात त्यांना सीबीआय मुख्यालयात हजर राहण्यास नोटीस दिली होती. पण चिदंबरम हजर झाले नाहीत. बुधवारी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला पण सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सरन्यायाधीशाकडे सोपवल्याने चिदंबरम यांची कायदेशीर अडचण झाली.

बुधवारी दिवसभर चिदंबरम घरी नसल्याने अनेक तर्कवितर्क उमटू लागले. पण त्यांनी बुधवारी रात्री काँग्रेस मुख्यालयात येऊन पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आपण आयएनएक्स मीडिया घोटाळ्यात कधीही आरोपी नव्हतो. माझ्या किंवा माझ्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले नाही. त्यामुळे मी आरोपी नाही, असे सांगितले. आम्हाला या घोटाळ्यात गोवले गेल्याने आमच्या वरचे सर्व आरोप खोटे असून तपास यंत्रणांनीही कायद्याचे पालन करावे असे ते म्हणाले. मी कुठेही पळून गेलो नव्हतो, मी मंगळवारी रात्रभर व बुधवारी दिवसभर माझ्या वकिलांसोबत होतो. मी कायद्यापासून पळून जात नव्हतो तर कायद्याच्या संरक्षण घेण्याचा प्रयत्न करत होतो. मी उच्च न्यायालयाचा आदर करत असून तपास यंत्रणांनी कायद्याचा सन्मान करावा असे ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेनंतर चिदंबरम त्यांच्या जोर बाग येथील निवासस्थानी गेले. तेथे सीबीआय व ईडीचे पथक दिल्ली पोलिसांचा फौजफाटा घेऊन आले. चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याच्या कारणाने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी भिंतीवर उड्या मारून त्यांच्या घरात प्रवेश केला व त्यांना अटक करण्यात आली.

सीबीआयच्या या ‘साहसी’ कारवाईचे वृत्तांकन करण्यासाठी देशातील सर्व मीडिया मागे होता. सीबीआय अधिकाऱ्यांमागे पत्रकार, त्यांचे कॅमेरे लागल्याने लाइव्ह हायव्होल्टेज ड्रामा देशाला पाहायला मिळाला.

चिदंबरम यांच्या अटकेला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची शक्यता पाहता दिल्ली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: