पुनर्विचार याचिकेला कुलभूषण यांचा नकार-पाकिस्तान

पुनर्विचार याचिकेला कुलभूषण यांचा नकार-पाकिस्तान

नवी दिल्लीः हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांनी त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्व

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात नेहरूंचा ‘ठळकपणे अनुल्लेख’
समीर वानखेडेंवर कारवाई होणार
अनीताची कहाणी – चोहीकडे नुसतंच पाणी

नवी दिल्लीः हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांनी त्यांना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला असून त्याऐवजी दयेच्या याचिकेचा पाठपुरावा आपण करू असे ते सांगत असल्याचे पाकिस्तानने बुधवारी जाहीर केले.

पाकिस्तानच्या परराष्ट्रखात्यातील अडिशनल अटर्नी जनरल अहमद इरफान यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, ‘माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना १७ जून रोजी फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत बोलावण्यात आले होते. पण त्यांनी अशी याचिका दाखल करण्यास नकार देत पूर्वीच्या दयेच्या याचिकेचा पाठपुरावा करण्यात आपली इच्छा असल्याचे पाकिस्तानच्या अधिकार्यांना सांगितले.

इरफान यांनी असेही सांगितले की, पाकिस्तान सरकारने मुदत संपण्यापूर्वी कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार व्हावा अशी याचिका इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल करावी यासाठी भारतीय उच्चायुक्तालयाशी सतत पत्रव्यवहार केला होता. अशी याचिका दाखल करणे हा जाधव यांचा न्यायिक अधिकार असून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या चौकटीत तो योग्य आहे.

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान सरकार आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत काम करत असून भारताने संबंध बिघडतील असे वर्तन सोडून व राजकारण न करता कायदेशीर मार्गाचा आधार घेत पावले उचलावीत. भारत ती पावले उचलेल व पाकिस्तानच्या कायद्याला मदत करतील असाही विश्वास इरफान यांनी व्यक्त केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0