पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात

पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात

वॉशिंग्टन : कमालीचा ढासळलेला आर्थिक विकासदर आणि कठोर आर्थिक धोरण नसल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट अवस्थेत असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

लंका आणि लंकेश्वर
विधायक राष्ट्रवादाची हाक
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात – रघुराम राजन

वॉशिंग्टन : कमालीचा ढासळलेला आर्थिक विकासदर आणि कठोर आर्थिक धोरण नसल्याने पाकिस्तानची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट अवस्थेत असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे (आयएमएफ) म्हणणे आहे. पाकिस्तानने आपली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी व कठोर आर्थिक धोरणे राबवण्याची गरज आहे असेही आयएमएफने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात आयएमएफने पाकिस्तानसाठी ६ अब्ज अमेरिकी डॉलर इतके कर्ज मंजूर केले असून त्या कर्जातील पहिला एक अब्ज डॉलरचा हप्ता पाकिस्तानला देण्यात आला आहे. या कर्जामुळे पाकिस्तानची वाढलेली वित्तीय तूट व आर्थिक गरजांवर उतारा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. पण केवळ कर्ज मिळाल्यामुळे नव्हे तर या देशाला महसूली तूट कमी करण्यासाठी २०२०च्या राष्ट्रीय अर्थसंकल्पात अनेक कठोर धोरणे आणावी लागतील असे आयएमएफचे म्हणणे आहे. आयएमएफ उर्वरित ५ अब्ज अमेरिकी डॉलरचे कर्ज तीन वर्षांच्या काळात हप्त्याहप्त्याने पाकिस्तानला देणार आहे.

आयएमएफने पाकिस्तानला कर्ज देण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९८०पासून आजपर्यंत आयएमएफने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मदत म्हणून १३ वेळा अब्जावधी डॉलरचे कर्ज दिले आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या तिजोरीत ८ अब्ज डॉलरहून कमी परकीय गंगाजळी शिल्लक राहिल्याने केवळ दीड महिन्यांची आयात करण्याची क्षमता पाकिस्तानकडे होती. त्यावेळी पाकिस्तानने आयएमएफकडे कर्जाची विनंती केली होती.

पाकिस्तानची अशी हालाखीची परिस्थिती पाहून सौदी अरेबिया, चीन व संयुक्त अरब अमिराती या मित्र देशांनी त्याला अब्जावधी डॉलरचे कर्ज देऊ केल्याने काही काळ अर्थव्यवस्था तग धरून आहे.

पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात सापडण्यामागे अनेक कारणे आहेत, पण महसूली तूट वाढवणारी दशकानुदशकांची बेशिस्त अशी आर्थिक धोरणे, वित्तीय धोरणांतील कमकुवतपणा व संरक्षणखर्चासाठी वारेमाप निधीची तरतूद याने अर्थव्यवस्थेतील संतुलन नष्ट झाले आहे. त्याने अर्थव्यवस्थेवर सार्वजनिक कर्जांचा भार वाढत गेला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0