सरोदे यांना सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी 

सरोदे यांना सरकारी वकील नियुक्त करण्याची मागणी 

पालघर झुंडबळी प्रकरणामध्ये मानवी हक्क विषयांचे वकील असीम सरोदे यांना, विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी अनेक जनसंघटनांनी केली आहे. त्य

नवलखा खटल्यातून आणखी एका न्यायाधीशाने अंग काढून घेतले
उन्नाव प्रकरण : ९० टक्के भाजलेल्या तरुणीचा अखेर मृत्यू
अर्णववरच्या दोन फिर्यादींवरील कारवाई रोखली
पालघर झुंडबळी प्रकरणामध्ये मानवी हक्क विषयांचे वकील असीम सरोदे यांना, विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी अनेक जनसंघटनांनी केली आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र शासन आणि पालघर पोलीस अधीक्षकांकडे मागणी करणारे पत्र पाठविण्यात आले आहे.
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना संघटनांनी पाठविलेल्या पत्रात म्हंटले आहे, की गेल्या आठवड्यात पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचणी गावात घडलेल्या हत्येप्रकरणात तीन निरपराध व्यक्तीचा जमलेल्या जमावाने निघृण हत्या केली. या हत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो.
टाळेबंधीच्या काळात आपल्या गावी जात असलेले दोन साधू सुशीलकुमार महाराज व चिकने महाराज आणि त्याच्या गाडीचे चालक श्री. निलेश तेलगडे ह्या तीघांची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी  व निषेधार्थ आहे.
सदर झुंड बळीच्या प्रकरणाला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? इतर काही कारणे आहेत का?  ह्या प्रकरणाची सरकारी पातळीवर विशेष चौकशी व्हावी म्हणून अँड.असीम सरोदे यांची विशेष सरकारी वकील, म्हणून नेमणूक व्हावी व निःपक्षपाती चौकशी व्हावी, अशी आमची मागणी वजा विनंती आपणाकडे आहे.
अँड.असीम सरोदे हे मानवाधिकार हक्काचे कार्यकर्ते असून गेले २० वर्षांपासून विविध न्यायालयामध्ये वकिली सेवा देत आहेत. सदर झुंडशाही हत्या प्रकरण ते अत्यंत संवेदनशील व निःपक्षपाती पणे चालवतील आणि गुन्हेगाराना कठोर शासन होईल असा आमचा विश्वास आहे.
आमचा अँड.असीम सरोदे यांच्याशी संपर्क झाला असून सदर प्रकरण चालविण्यासाठी त्यांनी आम्हाला संमती दिली आहे.
या संदर्भात आपल्याशी संपर्क करण्यात आल्याचे आणि आपण त्याला संमती दिल्याचे असीम सरोदे यांनी सांगितले.
या पत्रावर कँलीस ब्रास (अध्यक्ष: निर्भय जन संस्था), मनवेल तुस्कानो (उपाध्यक्ष :जनता दल महाराष्ट्र प्रदेश), नितीन डिमेलो (सरचिटणीस: निर्भय जन संस्था), पायस मच्याडो (संचालक: बॅसिन कॅथॉलिक बँक), जॉकीम कोरिया (खजिनदार:निर्भय जन संस्था ), जॉन परेरा ( अध्यक्ष: सेवादल-पालघर), जयश्री सामंत (वर्टी सर फौंडेशन-वसई ),
फ्रान्सिस डाबरे  (कार्याध्यक्ष:निर्भय जन संस्था), कुमार राऊत  (अध्यक्ष:जनता दल वसई),  विद्याधर ठाकूर – (सदस्य राष्ट्र सेवा दल मंडळ),  प्रज्ञा गावड – (संघटक राष्ट्र सेवा दल पालघर),  प्रकाश लवेकर  (अध्यक्ष जनता दल पालघर तालुका) यांच्या सह्या आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0