१६ एप्रिलला पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात तीन साधूंची जमावाने निर्घृण हत्या केली. गडचिंचले हे गाव पालघर जिल्ह्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ये
१६ एप्रिलला पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात तीन साधूंची जमावाने निर्घृण हत्या केली. गडचिंचले हे गाव पालघर जिल्ह्यातील कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. ही घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी सोशल मीडियात या घटनेचा एक व्हीडिओ आला आणि त्याने सामाजिक वातावरण एकाएकी पेटले. या तीन साधुंची हत्या मुसलमानांनी केली असल्याची एक अफवा लगेचच पसरत गेली. नंतर वेगळेच सत्य बाहेर आले.
पालघर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात आल्यानंतर साधुंना मारणार्या व्यक्ती ‘मार शोएब मार’ असे म्हणत असल्याचे काही ट्विटर अकाउंटवर सांगितले जाऊ लागले. चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दावा केला की या झुंडबळीमध्ये शोएब नावाची एक व्यक्ती सामील आहे.
सुरेश चव्हाणके हे सुदर्शन न्यूजचे संपादक आहेत, त्यांनीही दावा केला की त्यांनी पाहिलेल्या व्हिडिओमध्ये शोएब हे नाव ऐकले आहे.
दिल्लीस्थित भाजपच्या रिचा पांडे मिश्रा आपल्या ट्विटर अकाउंटवर म्हणतात,
“Hit Shoaib Hit, Kill them”, असे लिहितात. तर ‘Yana Mir‘ व ‘This Posable या ट्विटर अकाउंटवरून हेच ट्विट रि-ट्विट केले जाते. हा व्हिडिओ पुढे २,७०० अकाउंटवर रि-ट्विट केला जातो.
फेसबुकवर Our India या पेजवर मारहाणीचा हाच व्हीडिओ जातीय तेढ पसरवणार्या संदेशासह प्रसिद्ध केला जातो. हे पेज पुढे २,२०० इतक्या वेळा शेअर केले जाते.
मारहाणीत ख्रिश्चन मिशनरी सामील आहेत अशीही अफवा पसरली जाते
एका ट्विटर अकाउंटवरून ख्रिश्चन मिशनर्यांनी हिंदू साधुंना मारल्याचा दावा केला जातो.
#PalgharMobLynching
Sadhus R murdered by mobs in front of police.
Police failing to protect them
Media shows little concern for their plight
In the land of Yoga, dis can’t be tolerated & all groups involved must be made strictly accountable#हिन्दू_संतों_की_हत्या_क्यों#Palghar
व्हिडिओत शोएबचा उल्लेखच नाही
अल्ट न्यूजने जेव्हा हा व्हिडिओ अनेक अंगाने पाहिला, ऐकला तेव्हा लक्षात आले की, काही जण, ‘बास, ओए बास’ असे मारहाण करणार्यांना सांगत होते. त्यामुळे व्हीडिओत शोएबचा उल्लेखच नसल्याने तो शोएब आहे असे म्हणणार्यांचा दाव्यात तथ्य आढळले नाही.
नंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ जातो आणि ते सर्व माहिती तपासून सांगतात की, या घटनेत कोणतीही जातीय तेढ दिसत नसून आरोपी व साधू यांचे वेगवेगळे धर्म नाहीत.
गृहमंत्री आपल्या ट्विटर अकाउंटवर मुंबईसे सूरत जानेवाले ३ लोगों की पालघर में हुई हत्या के बाद मेरे आदेश से इस हत्याकांड में शामिल १०१ लोगों को पुलिस हिरासत में लिया गया है। साथ ही उच्च स्तरीय जांच के आदेश भी दिए गए हैं। इस घटना को विवादास्पद बनाकर समाज में दरार बनाने वालों पर भी पुलिस नज़र रखेगी।#LawAndOrder असा संदेश लिहितात.
ते असेही म्हणतात, की,
हमला करनेवाले और जिनकी इस हमले में जान गई – दोनों अलग धर्मीय नहीं हैं।
बेवजह समाज में/ समाज माध्यमों द्वारा धार्मिक विवाद निर्माण करनेवालों पर पुलिस और @MahaCyber1 को कठोर कार्रवाई करने के आदेश दिए गए हैं।#LawAndOrderAboveAll
नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालघर घटनेत जातीय तेढ नसल्याचे स्पष्ट करतात. गावात मुलं चोरणारी टोळी आली अशी अफवा पसरल्याने त्या साधुंवर जमावाने हल्ला केल्याचे ठाकरे फेसबुक लाइव्हद्वारे महाराष्ट्राच्या जनतेला सांगतात.
पालघरची घटना १६ एप्रिलच्या रात्री घडली. गडचिंचले गावात तीन साधुंवर स्थानिक जमावाकडून हल्ला केला जातो. एका अंत्यसंस्कार विधीला जायचे असल्याने मुंबईत कांदिवलीत राहणारे तीन साधू सिल्व्हासाकडे जायचे ठरवतात. लॉकडाऊन असल्याने ते व्हॅनमधून जात असतात. एका आडमार्गाने जात असताना एक जमाव त्यांच्या व्हॅनला रोखतो. त्यांना प्रश्न विचारतो. नंतर त्यांच्या व्हॅनवर दगडफेक केली जाते, चालकासह तीन साधुंना जबर मारहाण केली जाते. यात तीनही साधुंचा मृत्यू होतो. या घटनेची माहिती कळल्यानंतर सुमारे १०० जणांना अटक केली जाते. याच ९ जण अल्पवयीन आहेत.
अल्ट न्यूजने पालघर पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी या घटनेमागे कोणतेही धार्मिक, जातीय कारण नसल्याचे सांगितले. मृत झालेले साधू व त्यांना मारणारा जमाव एकाच धर्माचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जमाव हे आदिवासी आहेत असेही सांगितले जाते. या भागात स्थलांतरितांकडून आदिवासींची लूट केली जात असल्याची अफवा पसरली होती, त्यातून ही घटना घडल्याचे पोलिस सांगतात.
पालघर जिल्हापोलिस प्रमुख गौरव सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की या घटनेची सखोल चौकशी सुरू असून अफवा कोणाकडून पसरवली गेली याची माहिती घेतली जात आहे.
२०११च्या जनगणनेनुसार डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात २४८ कुटुंबे असून या घरांमध्ये राहणारे बहुसंख्य अनुसूचित जमातीचे आहेत.
हिंदुस्तान टाइम्सने १७ एप्रिल २०२० रोजी दिलेल्या वृत्तानुसार गडचिंचलेची घटना घडण्याअगोदरच्या दिवशी ठाण्यातले त्वचारोग तज्ज्ञ डॉ. विश्वास वळवी यांच्या गाडीवर सारणी या गावातल्या सुमारे २५० जणांच्या जमावाने हल्ला केला होता. यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले तर चार पोलिस जखमी झाले. डॉ. वळवी हे आदिवासी पाड्यात जाऊन तेथील कुटुंबात धान्य वाटप व आदिवासींची थर्मल स्क्रिनिंग करत होते. त्यानंतर त्यांना मारहाण झाली.
पालघर घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरेश चव्हाणके व अशोक पंडित या सोशल मीडियात सक्रीय असणार्यांनी दिला असला तरी वस्तुत: या घटनेमागे कोणतीही जातीय तेढ नाही.
मूळ वृत्त अल्ट न्यूज
COMMENTS