देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांचे पुरावे माझ्याकडे नाहीतः परमबीर सिंह

देशमुखांवरील खंडणीच्या आरोपांचे पुरावे माझ्याकडे नाहीतः परमबीर सिंह

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना पोलिसांकडून १०० कोटी रु.च्या कथित खंडणीप्रकरणात मंगळवारी ईडीने

स्विमिंग सूट फोटो : प्राध्यापिकेवर ९९ कोटींचा प्रतिमा हननचा दावा
ब्राझील – ‘राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय’
‘मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत हा राज्याचा प्रश्न’

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना पोलिसांकडून १०० कोटी रु.च्या कथित खंडणीप्रकरणात मंगळवारी ईडीने ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी या प्रकरणाला कलाटणी मिळाली. बुधवारी फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आपण लावलेल्या १०० कोटी रु.च्या खंडणी प्रकरणाचा एकही पुरावा नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. हे प्रतिज्ञापत्र या प्रकरणाचा तपास करणार्या चांदिवाल आयोगाला सादर केले आहे. या संदर्भात पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार चांदिवाल आयोगाचे विशेष पब्लिक प्रॉसिक्यूटर शिशीर हिरे यांनी अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपासंदर्भात कोणतेही अतिरिक्त पुरावे देण्यात असमर्थता दर्शवली आहे. तसेच या प्रकरणी परमबीर सिंह कोणत्याही उलट तपासणीसाठीही तयार नसल्याचसांगितल.  

गेल्या मार्च महिन्यात राज्य सरकारने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिं यांनी केलेल्या कथित १०० कोटी रु.च्या खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदिवाल आयोग स्थापन केला होता. हा आयोग एक सदस्यीय असून आयोगाने परमबीर सिं यांच्याविरुद्ध अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. पण परमबीर सिं एकदाही आयोगापुढे हजर झाले नाहीत. आयोगाने परमबीर सिं यांना जून महिन्यात ५ हजाररु. आणि इतर दोन वेळा गैरहजर राहिल्याप्रकरणी प्रत्येकी २५ हजार रु.चा दंड ठोठावला होता.

परमबीर सिं अद्याप बेपत्ता

राज्याच्या गृहमंत्र्यावर अनिल देशमुखांवर ते १०० कोटी रु. पोलिसांकडून वसूल करत असल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर परमबीर सिं बेपत्ता झाले आहेत. त्यांचा ठावठिकाणा अद्याप एकाही तपास यंत्रणेला मिळालेला नाही. परमबीर सिं यांना ठाणे न्यायालयाने हजर राहावे असे आदेशही दिले आहेत. तरीही परमबीर सिं अजून न्यायालयात वा राज्याच्या चौकशी आयोगापुढे हजर राहिलेले नाहीत.

काही दिवसांपूर्वी परमबी सिं देशाबाहेर पळून गेले अशीही वृत्ते प्रसिद्ध झाली होती. रविवारी काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी परमबीर सिं बेल्जियमला पळून गेल्याचा आरोप केला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: