सर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता

सर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता

नवी दिल्लीः प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना ममता बॅनर्जी य

पत्रकाराला गायब करण्याची भाजप नेत्याकडून धमकी
भाजपा≠ कॉन्ग्रेस (BJP is NOT equal to Congress!)
अवैज्ञानिक उद्योगात ‘आयआयटी’ही!

नवी दिल्लीः प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजपला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे, ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. ममता बॅनर्जी ५ दिवस दिल्लीत तळ ठोकून आहेत. या काळात त्या प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत.

मंगळवारी सोनिया गांधी यांच्यासोबतची ४५ मिनिटांची बैठक अत्यंत सकारात्मक झाली. भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागेल असे त्या म्हणाल्या. पिगॅसस हेरगिरी प्रकरणावर त्या म्हणाल्या की, माझाही फोन हॅक करण्यात आला होता. देशातील प्रमुख प्रसार माध्यम दै. भास्करवर छापे टाकण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले. काळा पैसा काय फक्त विरोधी पक्षांकडे आहे का असा सवाल करत मीडियातही तो आहे असे त्या म्हणाल्या. केंद्रातील भाजप सरकारला हरवण्यासाठी विरोधकांनी एकत्र काम केले पाहिजे. संसदेच्या अधिवेशनानंतर हे काम सुरू होऊ शकते असेही त्या म्हणाल्या.

विरोधकांच्या आघाडीचा चेहरा कोण असणार, असा सवाल ममता बॅनर्जी यांना केला असता त्यांनी आपण राजकीय भविष्यवेत्ते नसून हे परिस्थितीवर अवलंबून असेल. मी माझे विचार थोपवणार नाही, आम्ही सर्व एकत्र चर्चा करू. सर्वांच्या संमतीने एक चेहरा निश्चित केला जाईल. विरोधकांच्या आघाडीवर सोनिया गांधी राजी असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थगन प्रस्ताव दाखल करणार

दरम्यान पिगॅसस हेरगिरी प्रकरणावरून गेले काही दिवस विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडले आहे. पिगॅसस प्रकरणाची चौकशीची मागणी सरकारने फेटाळल्यानंतर विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांनी मंगळवारी पिगॅसस प्रकरणावर स्थगन प्रस्ताव आणण्याचे ठरवले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची काँग्रेसचे राज्यसभा सदस्य मल्लिकार्जुन यांनी बोलावलेल्या बैठकीत हजेरी लावली. ही बैठक खारगे यांच्या राज्यसभेतल्या कार्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राजद, समाजवादी पार्टी, माकप, भाकप, नॅशनल कॉन्फरन्स, आप, इंडियन मुस्लिम लीग, रिव्होल्युशनरी पार्टी, केरळ काँग्रेस (एम) व अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते.

या बैठकीत एकमेकांमध्ये समन्वय, सुसंवाद व एकता हवी हा मुद्दा चर्चिला गेला.

दरम्यान पिगॅसस हेरगिरी प्रकरण, महागाई, शेतकरी आंदोलन अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारच्या भूमिकेवर राहुल गांधी यांनी टीका केली. आम्ही सर्व विरोधक जनतेच्या मुद्द्यांवर लढत राहू व सरकारला समस्यांची उत्तरे द्यावी लागतील असे ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0