न्यू यॉर्कपेक्षा मुंबईत पेट्रोल महाग

न्यू यॉर्कपेक्षा मुंबईत पेट्रोल महाग

नवी दिल्लीः देशात मंगळवारी पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. ही दरवाढ गेल्या महिन्याभरात १७ वेळा झाली असून या नव्या दरवाढीमुळे देशाची आ

मोदींच्या राज्यात भारतीय मुस्लिम!
द्वेषाची कार्यशैली व दांडगाईचे राजकारण
श्रीलंकाः आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेने

नवी दिल्लीः देशात मंगळवारी पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. ही दरवाढ गेल्या महिन्याभरात १७ वेळा झाली असून या नव्या दरवाढीमुळे देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्या मुंबईत पेट्रोलचा प्रती लीटर दर १००.४७ रु. व डिझेलचा प्रती लीटर दर ९२.६९ रु. झाला. पेट्रोलचा दर जगाची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्या अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील पेट्रोल दरापेक्षा दुप्पट आहे. न्यू यॉर्कमध्ये पेट्रोलचा प्रती लीटर दर ५७ रु. (०.७९ डॉलर) इतका असल्याची माहिती ब्लूमबर्गने दिली आहे.

मंगळवारी पेट्रोलमागे प्रती लीटर २६ पैसे तर डिझेलमागे प्रती लीटर २३ पैसे दरवाढ झाली. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल ९४.४९ रु. प्रती लीटर, डिझेल ८५.३८ रु. प्रती लीटर झाले. देशात राजस्थानात सर्वाधिक व्हॅट असल्याने तेथे पेट्रोल व डिझेलचे दर प्रती लीटर अधिक आहेत. राजस्थानात गंगानगर येथे पेट्रोल १०५.५२ रु. प्रती लीटर व डिझेल ९८.३२ रु. असून त्यानंतर म. प्रदेश व महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात अनेक शहरात पेट्रोलने शंभरी पार केली आहे.

गेल्या १७ दिवसांत पेट्रोलमध्ये प्रती लीटर ४.०९ रु. तर डिझेलमध्ये प्रती लीटर ४.६५ रु. दरवाढ झाली आहे.

मे महिन्यात कोरोनाची लाट वाढल्याने देशातील इंधन विक्रीमध्ये १७ टक्के घट झाली असून ती १७.९ लाख टन इतकी झाली आहे. सर्वाधिक वापरल्या जाणार्या डिझेलमध्ये विक्री घसरून ती ४८.९ लाख टन झाली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0