कोरोना लस ९० टक्क्याहून प्रभावीः फायझरचा दावा

कोरोना लस ९० टक्क्याहून प्रभावीः फायझरचा दावा

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणारी आपली लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचा दावा फायझर या औषध निर्मिती कंपनीने सोमवारी केला. फायझरने ४३,५०० हजार कोरोना रुग्णांना दोन वेळा लस दिली असून त्यापैकी १० टक्क्याहून कमी रुग्णांना याची बाधा झाली तर ९० टक्के रुग्णांवर त्याचा योग्य परिणाम दिसून आला, असे कंपनीचे म्हणणे आहे. ही लस कोरोना रुग्णांना दोन वेळा देण्यात येत आहे.

फायझर अन्य जर्मन कंपनी बायोनटेक सोबत कोरोनावर लस विकसित करत असून कोरोना रुग्णाला दुसरा डोस दिल्यानंतर सात दिवसांनंतर ९० टक्के रुग्ण बरे झाले. म्हणजे २८ दिवसानंतर रुग्णामध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्याचे आढळून आले, असे फायझरचे म्हणणे आहे. कंपनीने आपल्या लशीसंदर्भातील माहिती सोमवारी जाहीर केल्यानंतर हा दिवस आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील गेल्या १०० वर्षांतील सर्वांत महत्त्वाचा दिवस असल्याचे म्हटले. विज्ञान व मानवता यांच्यादृष्टीने हा दिवस महान असल्याचेही या कंपनीने म्हटले आहे.

आपल्या लसीला मान्यता व तिला वापरण्याची परवानगी मिळावी म्हणून या महिन्याअखेर कंपनी आपला दावा अमेरिकेच्या एफडीएकडे करणार आहे.

फायझरच्या लसीमध्ये कोरोना विषाणूचा जेनेटीक कोड असून तो कोरोना बाधित रुग्णाच्या शरीरात सोडला जातो. त्यामुळे रुग्णामध्ये प्रतिकारक शक्ती वाढत जाते.

या लसीची चाचणी अमेरिका, ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना, द. आफ्रिका व तुर्कीमध्ये घेण्यात आली असून येथील कोरोना रुग्णांमध्ये ७ दिवसांनंतर ९० टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

या वर्षाअखेर फायझर या लसीचे पाच कोटी डोस तयार करणार असून २०२१च्या अखेरपर्यंत या लसीचे १.३ अब्ज डोस तयार करण्यात येणार आहेत. ब्रिटनने अगोदरच ३ कोटी लसीची मागणी नोंदवलेली आहे.

ही लस शून्य ते -८० अंश सेल्सियस तापमानात ठेवावी लागते. ही लस घेतल्यानंतर याची प्रतिकारक क्षमता किती दिवस शरीरात राहू शकते, वेगवेगळ्या वयोगटातल्या रुग्णांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, याची माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS