पीएम किसान पॅकेज : दीड कोटी शेतकरी अद्याप वंचित

पीएम किसान पॅकेज : दीड कोटी शेतकरी अद्याप वंचित

नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत २६ मार्चला जाहीर केलेल्या पॅकेजमधील रक्कम अद्याप दीड कोटीहून अधिक गरजू शेतकर्यांना मिळाली नसल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशव्यापी लॉकडाऊन पुकारल्यानंतर हे आर्थिक पॅकेज ८ कोटी ६९ लाख शेतकर्यांसाठी जाहीर केले होते. पण दीड कोटीहून अधिक शेतकर्यांच्या खात्यामध्ये केंद्राचे अद्याप २ हजार रु. जमा झालेले नाहीत. ११ एप्रिल २०२०अखेर ७ कोटी १० लाख शेतकर्यांना मदतीचा पहिला हप्ता मिळाला आहे, असे केंद्रीय कृषी मंत्रालयाने द वायरला सांगितले. सरकारने १५,४०० कोटी रु. गरजू शेतकर्यांना वाटल्याचेही सांगितले आहे. यातील १,६७५ कोटी रु. गेल्या वर्षाचे तर १३,७२६ कोटी रु. २०२०-२१ सालचे आहेत.

गेल्या महिन्यात जेव्हा निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती, तेव्हाच द वायरने आपल्या रिपोर्टमध्ये सरकारने जाहीर केलेली २००० रु.ची मदत ही अतिरिक्त मदत नसल्याचे सांगितले होते. आणि नियमानुसार एप्रिलमध्ये असेही शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा होणार होते.

पीएम-किसान योजनेंतर्गत दरवर्षी तीन हप्प्त्यात प्रत्येकी २ हजार रु. मदत जमा करण्याचा नियम आहे.

पण यंदा शेतकर्यांच्या खात्यात लवकर पैसे जमा झाल्याचे दिसून आले. या पूर्वी अनेक शेतकर्यांच्या खात्यात पहिला हप्ताही वेळेवर पडलेला दिसलेला नाही.

मूळ बातमी

COMMENTS