पुणे महानगरपालिकेचे ‘होम आयसोलेशन ॲप’

पुणे महानगरपालिकेचे ‘होम आयसोलेशन ॲप’

पुणे: पुणे महानगरपालिकेने कोविड-19 गृह विलगीकरण ॲप्लिकेशन (होम आयसोलेशन ॲप) सुरू केले आहे. गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वापरासाठी व

भारत सध्या सर्वांत मोठ्या संकटात : राजन
अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घरातच लस मिळणार
‘गर्दी टाळण्यासाठी राष्ट्रीय व्यापक धोरण हवे’

पुणे: पुणे महानगरपालिकेने कोविड-19 गृह विलगीकरण ॲप्लिकेशन (होम आयसोलेशन ॲप) सुरू केले आहे. गृह विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या वापरासाठी व त्यांच्या आरोग्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

पची वैशिष्ट्ये

* ताप, नाडी, ऑक्सिजन, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वतः ॲपद्वारे साध्या क्लिकद्वारे करू शकतो.

* स्वतःच्या मदतीसाठी रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो, जो संदेश प्रभागनिहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोहोचेल. तसेच रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल.

* या ॲपच्या प्रभागनिहाय डॅशबोर्डवर तसेच मुख्यालयातील वॉररूममध्ये एकत्रित डॅशबोर्डवर ऑक्सिजन, ताप इत्यादी सारख्या रुग्णाच्या लक्षणांवर व आरोग्याच्या स्थितीवर निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

* ज्या रुग्णांकडे स्मार्टफोन नाही, त्यांचे आप्तजन आरोग्य विषयक माहिती पाठवू शकतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0