आझादांची ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ स्थापन

आझादांची ‘डेमोक्रेटिक आझाद पार्टी’ स्थापन

जम्मूः काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी डेमोक्रेटिक आझाद पार्टी (डीएपी) या आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली. जम्

काश्मीरात १० दिवसांत पक्ष स्थापन होईलः गुलाम नबी आझाद
आझाद यांच्या राजीनाम्याचा भाजपला किती फायदा?
राहुलवर निशाणा साधत गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून बाहेर

जम्मूः काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सोमवारी डेमोक्रेटिक आझाद पार्टी (डीएपी) या आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली. जम्मू येथे त्या संदर्भात त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.

आपला पक्ष लोकशाही व मतस्वातंत्र्याचा आग्रही असेल. त्याच बरोबर आपल्या पक्षाची विचारसरणी म. गांधी यांच्या आदर्शवादावर आधारलेली आहे, असे आझाद यांनी सांगितले. आपल्या पक्षाची अन्य कोणत्याही राजकीय पक्षाशी स्पर्धा नसेल. आपले लक्ष्य जम्मू व काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणे व येथील जनजीवन सुरळीत होईल याकडे असेल असे आझाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

२६ ऑगस्टला आझाद यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला होता. त्याच्या नंतर काश्मीर खोऱ्यातल्या अनेक काँग्रेस नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आझाद यांच्यासोबत जाण्याची घोषणा केली. आझाद यांना राज्यातील दोन डझन काँग्रेस नेत्यांचा व माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांचा पाठिंबा आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0