काँग्रेसमध्ये ‘फाइव्ह स्टार कल्चर’- आझादांची टीका

काँग्रेसमध्ये ‘फाइव्ह स्टार कल्चर’- आझादांची टीका

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षातल्या नेत्यांचा सामान्य माणसाशी संपर्क तुटला आहे, हा पक्ष ‘फाइव्ह स्टार कल्चर’चा भाग झाला आहे, या पक्षाच्या संघटनात्मक रचनेत

जनमताची भाषा (लेखमालेतील भाग १)
विरोधकांचा अभाव असता…
कपिल सिब्बल यांच्यावर काँग्रेस नेत्यांचा निशाणा

नवी दिल्लीः काँग्रेस पक्षातल्या नेत्यांचा सामान्य माणसाशी संपर्क तुटला आहे, हा पक्ष ‘फाइव्ह स्टार कल्चर’चा भाग झाला आहे, या पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आमूलाग्र बदल करायला पाहिजेत, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी केले. बिहारमधील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसमधील रचनात्मक बदल करण्यापासून नवा अध्यक्ष निवडीपर्यंत तातडीने पावले उचलण्याची वेळ आली आहे, अशी मागणी गेले काही दिवस काँग्रेस नेते सार्वजनिक स्तरावर करत असताना त्यात आझाद यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. काँग्रेसमध्ये बदल हवे आहेत ही विद्रोही नव्हे तर सुधारणावादी मागणी, भूमिका आहे, आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाविरोधात नाही पण सुधारणावादाची अपेक्षा करत आम्ही नेतृत्वाचे हात बळकट करत आहोत, असेही ते म्हणाले.

आझाद यांनी काँग्रेसमध्ये जिल्हा पातळीवरून राज्यस्तरावर पक्षांतर्गत निवडणुका लवकर घ्याव्यात त्याने पक्षाच्या रचनेत बदल होईल, असे मत व्यक्त केले आहे. जिल्हा, पंचायत, ग्रामीण व राज्यपातळीवर नेते व कार्यकर्ते यांच्यात मोठे अंतर आहे. केवळ निवडणुकांमध्ये नव्हे तर अन्य वेळाही पक्षाचा जनतेशी संपर्क असण्याची गरज आहे. काँग्रेस नेत्यांनी निवडणुकांच्या दरम्यान तरी पंचतारांकित संस्कृती सोडण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसचे नेत्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची माहिती होणे अत्यावश्यक आहे. केवळ दिल्लीतून जाणे, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणे व दोन-तीन दिवसांनी पुन्हा दिल्लीत परत येणे याने पैशाची बरबादी होते, असे ते म्हणाले.

काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल असावेत, अशी मागणी २३ काँग्रेस नेत्यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांना केली होती. त्यात आझादही सामील होते.

आझाद यांनी बिहारच्या निवडणुकांवर काँग्रेसच्या कामगिरीबाबत काही भाष्य केले नाही.

दरम्यान काँग्रेसचे अन्य नेते व माजी केंद्रीयमंत्री सलमान खुर्शीद यांनी काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून कोणताही वाद नाही. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे सहकार्य जे नेत्रहिन नाहीत ते प्रत्येकजण पाहू शकतात, असे मत व्यक्त केले. पक्षासंदर्भातले विचार ठेवण्यास पर्याप्त मंच पक्षात उपलब्ध आहेत, पक्षाच्या बाहेर विचार करण्याने नुकसान होते, असे खुर्शीद म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1