एलपीजी सिलिंडरची किंमत विक्रमी पातळीवर

एलपीजी सिलिंडरची किंमत विक्रमी पातळीवर

नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शनिवारी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे एलपीजी सिलिंडरच्या किम

संघराज्य संबंधांना आव्हान देणारे एनआयए
पद्मश्री मिळूनही हाताला काम नाही : दैतारी नायक यांची खंत
गंगेच्या पातळीत वाढ; तरंगताना आढळले मृतदेह

नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शनिवारी ५० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे एलपीजी सिलिंडरच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील इंधन वितरक कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्याची अधिसूचना जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅसच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही वाढ करण्यात आल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

या वाढीनंतर दिल्लीत एलपीजीचा १४.२ किलोचा सिलेंडर ९९९.५० रुपये झाला आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतीची ही विक्रमी पातळी आहे.

एलपीजी सिलिंडरच्या दरात सहा आठवड्यांतील ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी २२ मार्च रोजी इंधन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली होती.

मे महिन्याच्या सुरुवातीला सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत १०२. ५० रुपयांची वाढ केली होती. या वाढीमुळे दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत २३५५.५० रुपयांवर गेली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे की खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ आणि इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे एप्रिलमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई (एकत्रित) ७.७ टक्क्यांवर पोहोचली असतानाच ही दरवाढ करण्यात आली आहे.

भू-राजकीय तणाव, अन्नधान्याच्या किमतींवर परिणाम करणारे उष्णता, विशेषत: गहू तसेच इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे वाहतूक खर्चात झालेली एकूण वाढ यामुळे महागाईचा दर वाढला आहे, जो मार्चमध्ये ६.९५ टक्क्यांच्या १७ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता.

घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीविरोधात काँग्रेसच्या युवा शाखेने शनिवारी पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांच्या निवासस्थानाजवळ निदर्शने केली.

भारतीय युवक काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली. निदर्शनात सहभागी असलेल्या काही लोकांनी हातात शेणाची गोंवरी आणि गॅस सिलिंडरही घेतले होते.

अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी नुकत्याच झालेल्या वाढीवरून काँग्रेसने शनिवारी केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी आणि अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत २०१४ मधील किमतीच्या बरोबरीने कमी करावी, असे म्हटले आहे.

नरेंद्र मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५८५ रुपयांनी वाढ केली आहे आणि सबसिडीही पूर्णपणे रद्द केली आहे, असा दावाही प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0