नुपूर शर्मांविरोधातल्या सर्व फिर्यादी दिल्ली पोलिसांकडे वर्ग

नुपूर शर्मांविरोधातल्या सर्व फिर्यादी दिल्ली पोलिसांकडे वर्ग

नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर निलंबनाची कारवाई झालेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात

संशोधनक्षेत्रातील विषमता
हवामान बदलाने शहरे बुडण्याची भीती
‘पटेली’ – नवे बंडखोर सौंदर्यशास्त्र

नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अवमानास्पद उद्गार काढल्यानंतर निलंबनाची कारवाई झालेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरातून जेवढ्या काही फिर्यादी नोंद झाल्या आहेत, त्या दिल्ली पोलिसांकडे वर्ग कराव्यात असे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्याच बरोबर या प्रकरणी पुन्हा नोंद होणाऱ्या फिर्यादीही दिल्ली पोलिसांकडे पाठवाव्यात असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता या पूर्ण प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांकडे गेला आहे.

काही दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर न्यायालयाने नुपूर शर्मा प्रकरणाची जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना अटक करू नये असे संरक्षण गेल्या आठवड्यात दिले होते.

आता नुपूर शर्मा आपल्या विरोधातल्या फिर्यादी रद्द व्हाव्यात या साठी दिल्ली उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

नुपूर शर्मा या सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पण्णीही मागे घ्यावी म्हणून दाद मागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या वक्तव्यावर कठोर मत व्यक्त केले होते, त्यामुळे आपल्याला बलात्काराच्या व जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्यामुळे न्यायालयाने आपल्याविरोधातील ताशेरे मागे घ्यावेत असेही शर्मा यांचे सर्वोच्च न्यायालयाला म्हणणे आहे.

गेल्या आठवड्यात नुपूर शर्मा यांना कायदेशीर मार्ग मिळावेत अशी आमची इच्छा आहे त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सूर्यकांत व न्या. पारदीवाला यांच्या पीठाने सांगितले होते. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांच्या खंडपीठाने शर्मा यांना दिल्ली पोलिसांच्या ‘इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन’ (IFSO) द्वारे तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही सक्तीच्या कारवाईपासून त्यांना दिलेले अंतरिम संरक्षण वाढवले.

मोहम्मद पैगंबर यांच्यावर अवमानजनक टिप्पण्णी केल्यानंतर नुपूर शर्मा यांच्याविरोधात देशभरातून ९ फिर्यादी दाखल झाल्या असून त्यांना अटक करण्यात येण्याची शक्यता वाढली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0