‘रेडिओ काश्मीर’ आता ‘ऑल इंडिया रेडिओ-जम्मू/श्रीनगर/लेह’

‘रेडिओ काश्मीर’ आता ‘ऑल इंडिया रेडिओ-जम्मू/श्रीनगर/लेह’

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा असलेले ३७० कलम रद्द केल्यानंतर ८८ दिवसांनंतर काल ३१ ऑक्टोबरपासून जम्मू व काश्मीर आणि लडाख हे दोन नवे केंद्र

शोपियन बनावट एन्काउंटः लष्करी अधिकाऱ्यावर कोर्ट मार्शल
वीज कर्मचाऱ्यांच्या संपाने अर्धे काश्मीर अंधारात
काश्मीरमधील पेलेट-पीडित

नवी दिल्ली : जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा असलेले ३७० कलम रद्द केल्यानंतर ८८ दिवसांनंतर काल ३१ ऑक्टोबरपासून जम्मू व काश्मीर आणि लडाख हे दोन नवे केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत. केंद्र सरकारने या दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी नवे नायब राज्यपालही नियुक्त केले असून आता श्रीनगर, जम्मू व लेहमधील ‘रेडिओ काश्मीर’चे नामकरण ‘ऑल इंडिया श्रीनगर’, ‘ऑल इंडिया जम्मू’ व ‘ऑल इंडिया लेह’ असे करण्यात आले आहे.

१९५०मध्ये ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या अखत्यारित ‘रेडिओ काश्मीर’ सुरू करण्यात आले होते. जम्मू व काश्मीरमधील रेडिओ स्टेशनला ‘रेडिओ काश्मीर’ असे नाव देण्यामागे पाकिस्तानच्या खोडसाळ प्रचाराला उत्तर देण्याची एक व्यूहरचना होती. १९४८मध्ये जम्मू व काश्मीर भारतीय संघराज्यात सामील झाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या रेडिओ स्टेशनमधून भारतविरोधी प्रचार सुरू असायचा. त्यावेळी पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधून आझाद काश्मीर रेडिओ त्रालखल, आझाद काश्मीर रेडिओ मुझफ्फराबाद अशी दोन रेडिओ स्टेशन सुरू केली होती. या रेडिओ स्टेशनच्या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी ‘रेडिओ काश्मीर’ असे नाव देण्यात आले होते, अशी माहिती ‘रेडिओ काश्मीर : इन टाइम्स ऑफ पीस अँड वॉर’ या राजेश भट लिखित पुस्तकात मिळते.

२९ मे १९६६मध्ये माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ‘ऑल इंडिया रेडिओ काश्मीर’ हे ‘रेडिओ काश्मीर’ का आहे , असा प्रश्न राज्यसभेत उपस्थित केला होता. या प्रश्नाचा संदर्भ पत्रकार राहुल पंडिता यांनी ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0