नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वेबसाइटवर जम्मू व काश्मीरच्या लोकसंख्येची आकडेवारी २०११ च्या जनगणनेपेक्षा भिन्न दाखवली आहे. या वेबसाइटवर काश
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वेबसाइटवर जम्मू व काश्मीरच्या लोकसंख्येची आकडेवारी २०११ च्या जनगणनेपेक्षा भिन्न दाखवली आहे.
या वेबसाइटवर काश्मीर खोऱ्याची लोकसंख्या ५,३५,८११ इतकी तर जम्मूची ६९,०७,६२३ व लडाखची २,९०,४९२ इतकी दाखवली आहे. ही एकूण लोकसंख्या ७७,३३,९२६ इतकी होते, पण गृहखात्याने त्याची बेरीज १,२५,४८,९२६ इतकी नमूद केली आहे.
ही आकडेवारी डेटा आॅपरेटरकडून चुकीची म्हणून नोंदली गेली असली, तरी एकूण लोकसंख्येतून जम्मू व लडाखची लोकसंख्या वजा केल्यास हा आकडा ५३,५०,८११ इतका होतो. पण ही आकडेवारीही काश्मीरची खरी लोकसंख्या होत नाही.
केंद्रीय गृहखात्याने आपल्या आकडेवारीचा स्रोत २०११ची जनगणना असल्याचे नमूद केले आहे. पण २०११ च्या जनगणनेत काश्मीरची लोकसंख्या ६९,०७,६२३ तर लडाखची लोकसंख्या १,२५,४८,९२६ इतकी दाखवली आहे.
गृहखात्याने आणखी एक चूक केली असून, त्यांनी जम्मू व काश्मीर आणि लडाखच्या एकूण लोकसंख्येच्या आकडेवारीतही घोळ घातला आहे.
जम्मूची लोकसंख्या ५३.५० लाख आहे ती ६९.०७ लाख अशी जाहीर केली आहे. २०११ च्या जनगणनेत काश्मीरची लोकसंख्या ६९,०७,६२३, जम्मूची ५३,५०८११ तर लडाखची २,९०,४९२ इतकी नमूद करण्यात आली आहे.
जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर व तेथे नागरी स्वातंत्र्यावर निर्बंध आणल्याने काश्मीर मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चिला जात आहे. मध्यंतरी सरकारने नवा नकाशाही प्रसिद्ध केला होता . त्यात जम्मू व काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशही दाखवण्यात आले होते. अशा परिस्थितीत लोकसंख्येची आकडेवारी चुकीची दिल्याने त्याचे पडसाद सर्वत्र पडू शकतात.
देशाची जनगणना वेगळी माहिती देते व सरकार वेगळी माहिती देते यातून संभ्रमही निर्माण होऊ शकतात.
काश्मीर खोऱ्यात कुपवाडा, बंदीपोरा, बारामुल्ला, श्रीनगर, बडगाम, गंदरबाल, पुलवामा, कुलगाम, शोपियान व अनंतनाग असे १० जिल्हे आहेत.
COMMENTS