‘मोदींचे वर्तन पंतप्रधानपदाला साजेसे नाही’

‘मोदींचे वर्तन पंतप्रधानपदाला साजेसे नाही’

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून ‘ट्यूबलाइट’ असा टोमणा मारल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असताना शुक्रवारी पंतप्रधान नरें

माझा शोध
गांधी विचार परीक्षा : कैद्यांच्या मानसिक पुनर्वसनाचा प्रयोग
मी आणि गांधीजी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून ‘ट्यूबलाइट’ असा टोमणा मारल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असताना शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्तन पंतप्रधानपदाला साजेसे नसून त्यांनी या पदाचा दर्जा घालवल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. वास्तविक पंतप्रधानाला एक विशिष्ट दर्जा असतो, उंची असते व त्यानुसार तसे वर्तन करणे अपेक्षित असते. पण आपल्या पंतप्रधानांमध्ये या गोष्टी आढळत नाहीत त्यांचे वर्तन या पदाला साजेसे नाही, असे राहुल गांधी म्हणाले. संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही, असाही त्यांनी आरोप केला.

लोकसभेत भाजप आक्रमक

दिल्लीतल्या एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका करताना देशातील युवकांना रोजगार न दिल्यास सहा महिन्यानंतर मोदी घराबाहेरही पडू शकणार नाहीत. त्यांना देशातील बेरोजगार युवक लाठ्या मारेल व त्यांना वास्तवाची जाणीव करून देईल असे वक्तव्य केले होते. त्यावर शुक्रवारी लोकसभेत भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. केंद्रीयमंत्री हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी लोकसभेत केल्यानंतर सभापतींच्या पुढ्यात दोन्ही पक्षाचे सदस्य आले व आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या गोंधळात सभापतींनी लोकसभेचे कामकाज स्थगित केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी सदस्य गोंधळ घालत ठरवून आम्हाला प्रश्न विचारू देत नाहीत असा आरोप केला. देशातील बेरोजगारीची उत्तरे पंतप्रधान देत नाहीत. त्यांना या समस्येतून कसा मार्ग काढावा हेही कळत नाही. आम्ही प्रश्न विचारल्यास ते जवाहर लाल नेहरू, बांगलादेश, पाकिस्तानचा मुद्दा काढतात पण बेरोजगारीवर बोलत नाहीत. या देशातील युवकांपुढे सर्वात मोठा प्रश्न नोकऱ्यांचा आहे. प्रत्येक तरुणाला आपले शिक्षण झाल्यानंतर रोजगाराची गरज आहे. पण सत्ताधाऱ्यांना हा मुद्दा लोकसभेत येऊन चर्चिला जावा अशी इच्छाही नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0