१५ एप्रिलनंतर सेवा देण्यास रेल्वे तयार

१५ एप्रिलनंतर सेवा देण्यास रेल्वे तयार

नवी दिल्ली : १४ एप्रिल रोजी २१ दिवसाचा देशव्यापी लॉकडाऊन संपणार असल्याने १५ एप्रिलपासून भारतीय रेल्वे आपल्या सर्व सेवा सुरू करण्यासाठी तयारीला लागली आ

कोरोना संकटाचे गांभीर्य नेतृत्वाला होते का?
तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
सरकारी खर्च कमी करण्याच्या काँग्रेसच्या सूचना

नवी दिल्ली : १४ एप्रिल रोजी २१ दिवसाचा देशव्यापी लॉकडाऊन संपणार असल्याने १५ एप्रिलपासून भारतीय रेल्वे आपल्या सर्व सेवा सुरू करण्यासाठी तयारीला लागली आहे. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे सुरक्षा कर्मचारी, गार्ड, तिकीट निरीक्षक, सिग्नल व्यवस्थापन व अन्य कर्मचारीवर्ग पुन्हा रेल्वे सेवा सुरू करण्यास तयार आहे.

मात्र मंत्रिमंडळाने हिरवा कंदिल दाखवल्याशिवाय रेल्वे सेवा सुरू होणार नाही पण रेल्वे प्रशासनाने देशातल्या सर्व १७ झोनना आपापल्या हद्दीतील रेल्वे वेळापत्रक, मालवाहतूक, डब्यांची उपलब्धता यासाठी रिस्टॉरेशन प्लान तयार करण्यास सांगितले आहे.

२१ दिवसांचा लॉकडाउन पुकारल्यानंतर रेल्वेने आपल्या १३,५२३ सेवा बंद केल्या होत्या. पण मालवाहतूक सेवा अजूनही सुरू आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0